फेसबुकवर IPS अधिकाऱ्याच्या नावाने फेक प्रोफाईल, आरोपी मागवायचा मुलींचे न्यूड फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 10:51 AM2021-07-03T10:51:41+5:302021-07-03T10:52:32+5:30

Crime News : आरोपी सद्दाम हुसेनकडून एक मोबाइल फोनही जप्त करण्यात आला आहे. ज्यामध्ये आयपीएस अधिकाऱ्याच्या फेसबुक अकाऊंटचे पुरावे सापडले आहेत.

muzaffarpur ips syed imran masood fake facebook profile girls nude picture | फेसबुकवर IPS अधिकाऱ्याच्या नावाने फेक प्रोफाईल, आरोपी मागवायचा मुलींचे न्यूड फोटो

फेसबुकवर IPS अधिकाऱ्याच्या नावाने फेक प्रोफाईल, आरोपी मागवायचा मुलींचे न्यूड फोटो

Next

मुजफ्फरपूर : गेल्या काही दिवसांत सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. बिहारच्या मुजफ्फरपुरात एका व्यक्तीने फेसबुक पेजवर ASP चे बनावट प्रोफाइल तयार करुन मुलींसोबत मैत्री करायचा आणि त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करत होता. मात्र, सायबर सेलच्या मदतीने मुजफ्फरपूर पोलिसांनी या व्यक्तीला यूपीच्या चांदौली येथून अटक केली आहे. 

आरोपी व्यक्तीने फेसबुकवर मुजफ्फरपूरच्या ASP WEST सय्यद इम्रान मसूद यांच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार केले होते. इतकेच नाही, तर या व्यक्तीने आयपीएस सय्यद इम्रान मसूद यांचा वर्दीतील प्रोफाइल फोटो ठेवला होता. या आरोपी व्यक्तीचे नाव मोहम्मद सद्दाम हुसेन आहे.

आयपीएस सय्यद इम्रान मसूद यांना जेव्हा त्यांच्या बनावट फेसबुक प्रोफाइलविषयी कळले, तेव्हा त्यांनी मुजफ्फरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सद्दाम हुसेन हा आयपीएस सय्यद इम्रान मसूद यांच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून मुलींकडून न्यूड फोटोंची मागणी करत होता. आरोपी सद्दाम हुसेन याला शहर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी यूपीच्या चांदौली पोलिस ठाण्याच्या धनेछा गावातून अटक केली आहे.

आरोपी सद्दाम हुसेनकडून एक मोबाइल फोनही जप्त करण्यात आला आहे. ज्यामध्ये आयपीएस अधिकाऱ्याच्या फेसबुक अकाऊंटचे पुरावे सापडले आहेत. तसेच, मोबाईल गॅलरीतून अनेक मुलींचे न्यूड फोटोही सापडले आहेत. आरोपी सद्दाम हुसेनची चौकशी केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

यापूर्वी मुझफ्फरपूरचे ASP WEST सय्यद इम्रान मसूद यांना वर्दीतील फोटो अपलोड करून एक फेसबुक प्रोफाइल तयार केल्याची माहिती मिळाली होती. या फेसबुक प्रोफाइलवरून डझनभर मुलींचे अश्लील फोटो आणि न्यूड फोटो मागवून त्याचा गैरवापर केला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सय्यद इम्रान मसूद यांनी शहर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. चौकशी दरम्यान आरोपी व्यक्तीचे ठिकाण उत्तर प्रदेशातील चांदौली जिल्ह्यातील साहबगंज येथे सापडले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी सद्दाम हुसेनला ताब्यात घेतले.

ASP WEST सय्यद इम्रान मसूद यांनी सांगितले की,  ओरिजिनल फेसबुकवर काही लोकांचा एक मेसेज आला की तुमचा बनावट प्रोफाइल तयार करुन चुकीचे कृत्य केले जात आहे. यानंतर शहर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. त्यानंतर आरोपी सद्दाम हुसेनला अटक करण्यात आली. हा आरोपी बर्‍याच मुलींशी संपर्क करायचा आणि अश्लील फोटो मागवत होता.

Web Title: muzaffarpur ips syed imran masood fake facebook profile girls nude picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.