माझ्या बापानं ५०-७० महिलांना मारून फेकलं; मुलीच्या खळबळजनक दाव्यानं FBI हादरलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 01:48 PM2022-10-28T13:48:24+5:302022-10-28T13:49:01+5:30
माझे वडील डोनाल्ड हे सीरियल किलर होते. वडील माझ्या आणि भाऊ बहिणींच्या मदतीने हे मृतदेह १०० फूट खोल विहिरीत दफन करायचे असं ती म्हणाली.
अमेरिकेतील एका मुलीने तिच्या बापाबद्दल केलेल्या गौप्यस्फोटामुळे खळबळ माजली आहे. मुलीच्या जबाबानंतर आता FBI नं या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. माझे वडील सीरियल किलर होते. त्यांनी ५० हून अधिक महिलांची हत्या केलीय. मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला असून त्यांनी हत्या केलेल्या महिलांचे मृतदेह एका विहिरीत दफन केलेत. दारू पिऊन वडिलांनी या हत्या केल्यात असा दावा मुलीने केला.
हे प्रकरण अमेरिकेतील LOWA परिसरातील आहे. मुलीच्या या दाव्यानंतर FBI यंत्रणेने तपासाला सुरुवात केली आहे. ४५ वर्षीय लूसी स्टडी(Lucy Studey)नं दावा केलाय की, माझे वडील डोनाल्ड डीन स्टडी यांनी ५० ते ७० महिलांची हत्या केली होती. त्याचसोबत २ पुरुषांनाही संपवलं होते. डोनाल्ड यांचा मृत्यू २०१३ मध्ये वयाच्या ७५ व्या वर्षी झाला. डोनाल्ड हा अमेरिकेत सर्वाधिक हत्या करणारा गुन्हेगार होता असं पोलिसांनीही मानलं आहे. त्यामुळे आता पोलिसांनी या मुलीचा जबाब नोंदवण्यास सुरुवात केलीय.
डोनाल्डच्या मलीने अलीकडेच News Week संस्थेशी संवाद साधला. पोलीस अधिकाऱ्यांनुसार, डोनाल्ड या महिलांना आमिष दाखवून लोवा येथील त्याच्या फार्म हाऊसवर बोलवत होता. पोलिसांच्या श्वानांनी डोनाल्ड यांच्या राहत्या ठिकाणी अनेक जागा संशयास्पद असल्याची पुष्टी केल्याची माहिती फ्रेमॉन्ट काऊंटी शेरिफ ऑफिस यांनी दिली. ज्या विहिरीत मृतदेह दफन केल्याचं समोर आले. ही विहीर खोदण्यासाठी अडीच कोटीपर्यंत खर्च आल्याचं समोर आले आहे.
लूसीने म्हटलं की, माझे वडील डोनाल्ड हे सीरियल किलर होते. वडील माझ्या आणि भाऊ बहिणींच्या मदतीने हे मृतदेह १०० फूट खोल विहिरीत दफन करायचे. उन्हाळ्यात मृतदेहाचा बंदोबस्त करण्यासाठी पिशवीचा आणि हिवाळ्यात छोट्या बर्फगाडीचा वापर केला जायचा. ज्या महिलांची हत्या केली त्यांना डोनाल्ड आमिष दाखवून बोलवायचे. या महिला ओमाहाशी संबंधित असून त्या सेक्स वर्कर होत्या. डोनाल्ड यांना २ पत्नी होत्या त्यांचा मृत्यू आधीच झाला आहे.
या विहिरीची तपासणी करावी. ज्या महिलांना तिथे गाडलं आहे त्यांचे मृतदेह सन्मानपूर्वक दफन केले जावेत अशी इच्छा लूसीने व्यक्त केली. डोनाल्ड यांच्यावर १९५० मध्ये चोरीचा आरोप लागला होता त्यामुळे ते जेलमध्ये होते. १९८९ मध्ये ड्रंक अँन्ड ड्राईव्ह केसमध्येही ते अडकले. आयुष्यभर गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिलेले डोनाल्ड अखेर २०१३ मध्ये मृत्यूमुखी पडले असं लूसी म्हणाली.