Sameer Wankhede's Father Name: माझ्या वडिलांचे नाव ज्ञानदेव, आई मुस्लिम; NCB च्या समीर वानखेडेंचे दु:खी मनाने पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 03:36 PM2021-10-25T15:36:08+5:302021-10-25T15:59:49+5:30
Sameer Wankhede answer on Muslim Father allegation by Nawab malik: ज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी नोकरी मिळविण्यासाठी धर्म बदलल्याचा आरोप करताना त्यांचे जन्म प्रमाणपत्रच जाहीर केले होते.
मी बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे. माझे वडील हिंदू आहेत आणि आई मुस्लिम होती. माझी खासगी कागदपत्रे अशाप्रकारे ट्विटरवर टाकणे अपमानास्पद असल्याचे म्हणत एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी नोकरी मिळविण्यासाठी धर्म बदलल्याचा आरोप करताना त्यांचे जन्म प्रमाणपत्रच जाहीर केले होते. (What is real name of Sameer Wankhede's Father?)
महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या वैयक्तीक आरोपांमुळे मी दु:खी आहे. हे माझ्या कुटुंबाच्या प्रायव्हसीचे उल्लंघन आहे, असे समीर वानखेडे (Sameer Wankhede) म्हणाले. माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे हे राज्याच्या एक्साईज खात्यातून वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. ते हिंदू होते. माझी आई दिवंगत झहिदा ही मुस्लिम होती. मी बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे, मला याचा अभिमान आहे. मी 2006 मध्ये डॉ. शबाना कुरेशी हिच्याशी कायदेशीररित्या विवाह केला होता. तसेच 2016 मध्ये कायदेशीररित्या घटस्फोटही घेतला होता. 2017 मध्ये मी क्रांती दिनानाथ रेडकर हिच्याशी विवाह केला, असे वानखेडे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. (Aryan Khan Drugs Case)
I belong to multi religious and secular family. My father is a Hindu and my mother was a Muslim. Publishing of my personal documents on Twitter is defamatory and invasion of my family privacy. Pained by slanderous attacks by Maharashtra Minister Nawab Malik: Sameer Wankhede, NCB pic.twitter.com/L0VZKHIZ8p
— ANI (@ANI) October 25, 2021
अशा प्रकारे सोशल मीडियावर माझे वैयक्तीक डॉक्युमेंट जाहीर करणे हे माझी आणि माझ्या कुटुंबाचा खासगीपणा धोक्यात आणण्यासारखे आहे. माझी माझ्या कुटुंबाची प्रतिमा मलिन करण्याचा यामागे उद्देश आहे. राज्याचे मंत्री माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर गेल्या काही दिवसांपासून मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. याचे मला दु:ख होत असल्याचे वानखेडे यांनी म्हटले आहे.