महाआघाडी सरकारविरुद्ध माझी लढाई अधिक जोमाने पुढे जाणार; किरीट सोमय्यांना अर्ध्या डझन नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 09:10 PM2021-09-15T21:10:57+5:302021-09-15T21:11:51+5:30
Kirit Somaiya : आरोपांबाबत सोमय्या यांना शिवडी न्यायालयाने समन्स बजावले असून येत्या ५ ऑक्टोबर रोजी त्यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज्यात सत्तेवर असलेल्या महाआघाडी सरकारच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधत शिवसेना पक्षातील नेत्यांचं भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणले आहेत. अलीकडेच त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात बोलतो म्हणून उद्धव ठाकरेंचे गुंड मला गोळ्या झाडण्याच्या धमकी देत आहेत', असा गंभीर आरोप केला होता. तसेच, कितीही गुंडांना बोलावले आणि दाऊदला आणले तरी आम्ही घाबरणारे नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. १०० कोटींचा खटल्यांचा अर्ध्या डझन नोटीस ठाकरे सरकारचा नेत्यांकडून मला आतापर्यंत मिळाल्या आहेत. प्रताप सरनाईक, रवींद्र वायकर, हसन मुश्रीफ, अनिल परब, जितेंद्र आव्हाड यांचे वाझे. त्यांनी माझी बायको आणि मुलाचीही चौकशी केली असून भ्रष्ट महाआघाडी सरकार विरुद्ध माझी लढाई अधिक जोमाने पुढे जाणार असं ट्वीट भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे.
माजी खासदार किरीट सोमय्यामागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी अर्थ या एनजीओवरदेखील गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. याच आरोपांबाबत सोमय्या यांना शिवडी न्यायालयाने समन्स बजावले असून येत्या ५ ऑक्टोबर रोजी त्यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
शंभर कोटींच्या खटल्यांच्या अर्ध्या डझन नोटीस ठाकरे सरकारच्या नेत्यांकडून मला मिळाल्या आहेत प्रताप सरनाईक रवींद्र वायकर हसन मुश्रीफ अनिल परब जितेंद्र आव्हाड यांचे वाझे
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 15, 2021
त्यांनी माझी बायको आणि मुलाचीही चौकशी केली
"चोर मचाये शोर"
भ्रष्ट MVA सरकारविरुद्ध माझी लढाई जोमाने पुढे जाणार
तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून ४० CISF जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेत. ही झेड दर्जाची सुरक्षा आहे. किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री, नेत्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात मोहीम सुरु केल्यानंतर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या होत्या. या धमक्यानंतर किरीट सोमय्या यांनी केंद्राकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. सोमय्यांची मागणी तात्काळ मान्य करत त्यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली. आजपासून सोमय्यांभोवती केंद्राच्या जवानांचं सुरक्षेचं कवच आहे.