माझ्या पतीने सर्जिकल चाकूने हल्ला केला, मृत्यूपूर्वी महिला डॉक्टरचे हादरवून टाकणारे शब्द 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 12:49 PM2022-02-22T12:49:24+5:302022-02-22T13:11:43+5:30

Murder Case : मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबात महिलेने पतीवर आरोप केले, तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

My husband attacked me with a surgical knife, the shocking words of a female doctor before she died | माझ्या पतीने सर्जिकल चाकूने हल्ला केला, मृत्यूपूर्वी महिला डॉक्टरचे हादरवून टाकणारे शब्द 

माझ्या पतीने सर्जिकल चाकूने हल्ला केला, मृत्यूपूर्वी महिला डॉक्टरचे हादरवून टाकणारे शब्द 

Next

बुलंदशहर - मला नीरजने मारले.. माझ्या पतीने.. दोन चाकूने मारले. आणि काही वेळाने तिला जीव गमवावा लागला. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका पतीने डॉक्टर पत्नीचा गळा चिरून खून केला आहे. मृत्यूपूर्वीपोलिसांना दिलेल्या जबाबात महिलेने पतीवर आरोप केले, तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

३० वर्षीय पूनम देवी असे मृत महिलेचे नाव आहे. तिचे लग्न नीरज सिंगसोबत ५ वर्षांपूर्वी झाले होते. दोघांना एक ३ वर्षाचा मुलगाही आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती आणि सासरच्या लोकांकडून हुंड्याच्या मागणीमुळे ती वेगळी राहू लागली. महिलेने बुलंदशहरमध्ये क्लिनिक उघडले होते. आरोपी पतीने तिच्या मानेवर सर्जिकल चाकूने दोन वार केले.


घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी डॉक्टर महिला क्लिनिकच्या केबिनमधून बाहेर आली तेव्हा अचानक तिच्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता. ती त्या खोलीकडे धावली जिथे तिचे सहकारी बसले होते. पूनम जखमी अवस्थेत क्लिनिकमधून बाहेर आली आणि तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिच्या पतीला पकडण्यासाठी स्थानिक लोकांना सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णवाहिकेसमोर पोहोचले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी पूनमचा मृत्यूपूर्व जबाब एका हवालदाराने नोंदवला. पूनमच्या आक्रोशाने जमलेल्या लोकांनी आरोपी पती नीरजला पळून जाण्यापूर्वी पकडले. तेथे उपस्थित लोकांनी कापूस ठेवून मानेतून निघणारे रक्त थांबविण्याचा प्रयत्न केला. यासोबतच गळ्यात कापडही बांधले होते. अखेरच्या क्षणी प्रयत्न करूनही पूनमचा जीव वाचू शकला नाही. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गुलावठी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.

Web Title: My husband attacked me with a surgical knife, the shocking words of a female doctor before she died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.