माझी आईच जेवण बनवते, ती झोपलीय २ दिवसांपासून म्हणून जेवले नाही...पण ती होती मृत 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 10:07 PM2021-05-22T22:07:58+5:302021-05-22T22:16:50+5:30

Crime News : माझी आईच जेवण बनवते आणि ती दोन दिवसापासून झोपली असल्यामुळे मी जेवले नाही असे तिने सांगितले. अशी ही हृदयद्रावक घटना घडली आहे. 

My mother makes the food, she hasn't eaten since she was 2 days asleep ... but she was dead | माझी आईच जेवण बनवते, ती झोपलीय २ दिवसांपासून म्हणून जेवले नाही...पण ती होती मृत 

माझी आईच जेवण बनवते, ती झोपलीय २ दिवसांपासून म्हणून जेवले नाही...पण ती होती मृत 

Next
ठळक मुद्देमानसिक दृष्ट्या कमजोर असलेल्या त्या महिलेला आपल्या आई आणि भावाचा मृत्यू झाला आहे, हे काही कळले देखील नाही. जेव्हा शेजारच्या माणसांना वास यायला लागला तेव्हा ही घटना उघडकीस आली.

बंगळुरु : कोरोना महामारीत अनेक लोकांचे जीव गेले आहेत. तसेच या काळात अनेक धक्कादायक घटना देखील समोर आल्या आहेत. अशीत एक हृदय पिळवटून टाकणारी घटना बंगळूरमधील राजाराजेश्वरी नगरमधून समोर आली आहे. येथे एक ४७ वर्षाची अविवाहित महिला दोन दिवस आपल्या आई आणि भावाच्या मृतदेहाजवळ न खाता पिता बसून राहिली. मानसिक दृष्ट्या कमजोर असलेल्या त्या महिलेला आपल्या आई आणि भावाचा मृत्यू झाला आहे, हे काही कळले देखील नाही. जेव्हा शेजारच्या माणसांना वास यायला लागला तेव्हा ही घटना उघडकीस आली.

शौचास गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार; २ आरोपी अटकेत 

 

पोलिसांना या बद्दलची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांना खिडकीजवळ हरिश नावाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला. तसेच दुसऱ्या खोलीत त्यांना आयार्बा नावाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांनी श्रीलक्ष्मी नावाच्या महिलेला पहिले, ती हरिशची मोठी बहिण असल्याचे पोलिसांना चौकशीदरम्यान समोर आले. तिला मानसिक आजार असल्याने आपल्या आई आणि भावाचा मृत्यू झाला आहे, हे तिच्या लक्षात आले नाही. नंतर तु काही खाल्लंस का? असा प्रश्न पोलिासांनी श्रीलक्ष्मीला केला असता माझी आईच जेवण बनवते आणि ती दोन दिवसापासून झोपली असल्यामुळे मी जेवले नाही असे तिने सांगितले. अशी ही हृदयद्रावक घटना घडली आहे. 

Web Title: My mother makes the food, she hasn't eaten since she was 2 days asleep ... but she was dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.