भाच्याने मामालाच गंडवले, ५० तोळे सोने चोरून केली जीवाची मुंबई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 08:06 AM2021-09-06T08:06:29+5:302021-09-06T08:07:09+5:30

पुण्यात भाजीपाला व्यवसाय करणाऱ्याने बीडमधील आपल्या घरी बारावीत शिकणाऱ्या भाच्याला ठेवले होते. भाच्याकडे समवयस्क मित्रांचे येणे-जाणे वाढले. त्यातून घरातील ५० तोळे दागिने चोरुन मुंबई सफर करण्याची भन्नाट कल्पना त्यांना सुचली

My nephew ruined my mother-in-law, stole 50 ounces of gold pdc | भाच्याने मामालाच गंडवले, ५० तोळे सोने चोरून केली जीवाची मुंबई

भाच्याने मामालाच गंडवले, ५० तोळे सोने चोरून केली जीवाची मुंबई

googlenewsNext
ठळक मुद्देएकाचवेळी तिघे गायब झाल्याने नातेवाईकांची चौकशी सुरू केली तेव्हा भाच्याने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी घरात आढळली.

बीड : शिक्षणासाठी मामाकडे राहायला आलेल्या भाच्याने मित्रांच्या मदतीने तब्बल ५० तोळे दागिने चोरले. त्यानंतर ते मित्रांमध्ये वाटून घेत हौसमौज करण्यासाठी थेट मुंबई गाठली. विशेष म्हणजे सातही जण अल्पवयीन असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

पुण्यात भाजीपाला व्यवसाय करणाऱ्याने बीडमधील आपल्या घरी बारावीत शिकणाऱ्या भाच्याला ठेवले होते. भाच्याकडे समवयस्क मित्रांचे येणे-जाणे वाढले. त्यातून घरातील ५० तोळे दागिने चोरुन मुंबई सफर करण्याची भन्नाट कल्पना त्यांना सुचली. त्यानुसार सात जणांत दागिने वाटून घेतले. १ सप्टेंबर रोजी भाच्यासह तिघांनी पुणे, मुंबईला जाऊन आपले शौक पूर्ण केले. एकाचवेळी तिघे गायब झाल्याने नातेवाईकांची चौकशी सुरू केली तेव्हा भाच्याने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी घरात आढळली. त्यात कोणाला किती तोळे दागिने वाटप केले, याचा तपशील आढळला. त्यानंतर हा प्रकार समाेर आला. तिघांनाही ५ सप्टेंबर रोजी बीडला आणून पोलिसांनी सातही जणांची चौकशी सुरु केली आहे.

दागिन्यांवर कर्ज
यातील एकाने ६५ हजार रुपयांचा मोबाईल घेतला, तर दुसऱ्याने १४ तोळे दागिने एका खासगी फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवून त्यावर लोन घेतले. एकाने १० तोळे दागिने अवघ्या दीड लाखांत एका सराफाला विक्री केल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या चौकशीत पुढे आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

 

Web Title: My nephew ruined my mother-in-law, stole 50 ounces of gold pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.