मुंबईतून बेपत्ता झालेल्या 126 मुलींचे गूढ कायम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:29 AM2021-01-04T04:29:37+5:302021-01-04T04:29:49+5:30

७०८ जणींचे अपहरण : ५२८ मुलींचा लागला शेाध 

Mystery of 126 missing girls from Mumbai remains | मुंबईतून बेपत्ता झालेल्या 126 मुलींचे गूढ कायम 

मुंबईतून बेपत्ता झालेल्या 126 मुलींचे गूढ कायम 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : मुंबईतून गेल्या ११ महिन्यात ७०८ मुलींच्या अपहरणाची नोंद करण्यात आली. यापैकी ५८२ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. यात १२६ मुलींच्या बेपत्ता होण्यामागचे गूढ कायम आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.


एनसीआरबीच्या २०१९च्या अहवालानुसार, राज्यभरातून ५६ हजार ७५० पुरुष आणि ६७ हजार ७४६ महिला आणि १९ तृतीय पंथी असे एकूण १ लाख २४ हजार ५१५ जण बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी झाली. त्यापैकी ६७ हजार १८ जणांचा शोध घेण्यास यश आले. यात अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक होते.


अशात मुंबईतही अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढत आहेत. यात, लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत याचे प्रमाण घटले आहे. मुंबई पोलिसांच्या आकडेवाऱीनुसार, गेल्या वर्षी नोव्हेबर अखेरपर्यंत ७०८ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. अल्पवयीन असल्याने याप्रकरणी अपहरणाची नोंद करत अधिक तपास सुरू करण्यात आला. यापैकी ५०८ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहेत. 


२०१९ मध्ये १२४० मुलींच्या अपहरणाची नोंद झाली होती. त्यापैकी १०७६ मुलींचा शोध घेण्यास यश आले. 
याचबरोबर तरुणी आणि ज्येष्ठ नागरिक बेपत्ता होण्याच्या घटनाही डोके वर काढत आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात मिसिंग पथक कार्यरत आहेत. हे मिसिंग व्यक्तीसाठी कार्यरत आहेत.

पालक ओरडले 
म्हणून सोडले घर 

बऱ्याच प्रकरणात मोबाइलचा अतिवापर, गेम, अभ्यास न करणे, शिवाय क्षुल्लक कारणातून पालक ओरडले म्हणून घर सोडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.  तर काही प्रकरणात प्रेम प्रकरण, 
फूस लावून पळवून नेण्याच्या 
घटनाही समोर आल्या आहेत. अशा घटनांमुळे पोलिसांवरील ताण वाढला आहे. पालकांच्याही चिंतेत भर पडली आहे.

Web Title: Mystery of 126 missing girls from Mumbai remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.