अखेर गूढ उकलले! निवृत्त रेल्वे अभियंत्याच्या पत्नीची राहत्या घरात झाली होती हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 10:07 PM2021-09-01T22:07:06+5:302021-09-01T22:08:25+5:30
Murder Case : पोलिसांनी दरोडेखोर टोळीच्या चारजणांना अटक केली आहे. तसेच दोन दरोडेखोर फरार असल्याची माहिती आहे.
दोन महिन्यांनी निवृत्त रेल्वे अभियंत्याच्या पत्नीच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांना यश आलं आहे. चोरीच्या उद्देशाने वृद्ध महिलेची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. बिहारची राजधानी पाटणा शहरातील नाडी पोलीस स्टेशन परिसरातील सबलपूर त्रिवेणी घाट येथे १ जुलै २०२० रोजी हा प्रकार घडला होता. PWI च्या निवृत्त रेल्वे अभियंत्याची पत्नी घरात एकटीच असताना तिची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर चार दिवसांनी महिलेचा मृतदेह राहत्या घरी सापडला होता. पोलिसांनी दरोडेखोर टोळीच्या चारजणांना अटक केली आहे. तसेच दोन दरोडेखोर फरार असल्याची माहिती आहे.
अटक केलेल्या दरोडेखोरांकडून पोलिसांनी चोरीच्या दोन मोटारसायकली, टीव्ही, २५ हजार रोख आणि तीन चोरीचे मोबाईलही जप्त केले आहेत. असे म्हटले जाते की, १ जुलै रोजी ६-७ गुन्हेगारांनी सेवानिवृत्त अभियंता यांची वृद्ध पत्नी लीला चौधरीचा दरोडा टाकण्याच्या उद्देशाने गळा दाबून खून केला होता, नंतर दरोडेखोरांनी दागिने, टीव्ही, मोबाईल, २५ हजार घरात ठेवले होते ते घेऊन पळून गेले. लीला चौधरी घरात एकट्याच पडून असताना चार दिवसांनंतर, घरातून दुर्गंधी येत होता. स्थानिक लोकांच्या माहितीवरून पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला आणि नालंदा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
मित्रासोबत दिल्लीत आलेल्या मुलीवर रिक्षाचालकाने केला बलात्कार; बिहारहून केली अटकhttps://t.co/T93AhL5u47
— Lokmat (@MiLOKMAT) September 1, 2021
तपासात पोलिसांना समजले की, लीला चौधरींची हत्या दरोड्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. पोलिसांनी मोबाईल सीडीआरच्या आधारे दीपक कुमार नावाच्या दरोडेखोरला अटक केली आणि त्याच्या माहितीवरून रोहित डोम, रोशन कुमार आणि राजन साहनी या हत्या आणि दरोडा प्रकरणातील इतर तीन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. फतुहा एसडीपीओ राजेशकुमार मांझी यांनी सांगितलं की, सुरुवातीला हे संपूर्ण प्रकरण काय हे नेमकं समजत नव्हतं, परंतु पोलिसांच्या तपासामुळे संपूर्ण घटना उघडकीस आली.