मानवी सांगाड्याचं गूढ अखेर उकललं; सुनेची हत्या करून पेटवून दिला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 09:41 PM2021-12-10T21:41:55+5:302021-12-10T21:43:42+5:30
Murder Case : रीनाचे (२७) लग्न १० वर्षांपूर्वी संजय नावाच्या तरुणासोबत झाला होता. तिला दोन मुलं आहेत. सासरच्या मंडळींनी तक्रार केली आणि पोलिसांना सांगितलं की, रीना ५० हजार रुपये घेऊन पळून गेली होती.
हरयाणातील जिंदमधील नगूरा भागात सापडलेल्या मानवी सांगाड्याचं गूढ उघडकीस आलं आहे. हा मानवी सांगाडा रीना नावाच्या एका महिलेचा आहे. काही दिवसांपूर्वी महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, रीना बेपत्ता नव्हती तर सासरच्या मंडळींनी तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
रीनाचे (२७) लग्न १० वर्षांपूर्वी संजय नावाच्या तरुणासोबत झाला होता. तिला दोन मुलं आहेत. सासरच्या मंडळींनी तक्रार केली आणि पोलिसांना सांगितलं की, रीना ५० हजार रुपये घेऊन पळून गेली होती. मात्र, या प्रकरणाला वेगळंच वळण लागले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर रीनाच्या सासरच्या मंडळींना अटक करण्यात आली आहे. अद्याप रीनाच्या हत्येमागील कारण समोर आलेलं नाही. पोलिसांकडून रीनाच्या पतीसह सासरच्या मंडळींची चौकशी केली जात आहे.
सासरच्या मंडळींनी तिच्या हत्या करून कचऱ्यावर मृतदेह ठेवून त्याला आग लावल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये रीनाची सासरची मंडळी तिची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह सायकलवरुन घेऊन जात असताना दिसत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
'सॉरी पप्पा, मला माफ करा' असं लिहून पोटच्या मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
७ डिसेंबर रोजी रस्त्यावर मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ माजली होती. तो सांगाडा रीनाचा होता असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. सासरच्या मंडळींनी रीनाची हत्या करून मृतदेह जाळला आणि यानंतर तिचा सांगाडा झाडांमध्ये फेकून दिला. हा सर्व धक्कादायक घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. व्हायरल फुटेजमध्ये रीनाचे सासरे सायकलवरुन मृतदेह घेऊन जाताना दिसत आहेत. सीसीटीव्हीत पुढे रीनाचा पतीही दिसत आहे.