सावंतवाडीतील 'त्या' आत्महत्येचे गूढ वाढले; सीआयडीमार्फत तपास करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 01:57 PM2020-01-03T13:57:08+5:302020-01-03T13:59:34+5:30

खा.विनायक राऊत यांनी केले कुटुंबियांचे केले सांत्वन  

The mystery of 'that' suicide in Sawantwadi has increased; Demand for investigation by CID | सावंतवाडीतील 'त्या' आत्महत्येचे गूढ वाढले; सीआयडीमार्फत तपास करण्याची मागणी

सावंतवाडीतील 'त्या' आत्महत्येचे गूढ वाढले; सीआयडीमार्फत तपास करण्याची मागणी

Next
ठळक मुद्दे उमेश यादव यांचा मृतदेह सकाळी मिळाल्यानंंतर येथील कुटीर रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.मृत उमेश यांच्या मागे पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे.पुढील काही तासात हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग होईल असे राऊत यांनी सांगितले.

सावंतवाडी - येथील मोती तलावात आत्महत्या केलेल्या उमेश बाबुराव यादव यांच्या आत्महत्येचे गुढ वाढले आहे. कारण अद्यापपर्यंत तरी अस्पष्ट आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांनी प्रकरणाचा तपास पोलिसांकडून काढून घेऊन स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविला आहे. त्यामुळे त्याचे पथक दिवसभर सावंतवाडी शहरात ठाण मांडून होते. तसेच या कुटुंबाला पोलिसांनी संरक्षणही दिले आहे. दरम्यान उमेश यादव यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहली असून, ती कुटुंबाकडे असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र सध्या त्यांची मनस्थिती चांगली नसल्याने देणार नाही, असे पोलीस जबाबात म्हटल्याचे पोलीस उपअधीक्षक डॉ.नितीन काटेकर यांनी पत्रकारांशी बोलतना सांगितले. खासदार विनायक राऊत यांनी यादव यांच्या घरी भेट दिली आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले.तसेच हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली असून पुढील काही तासात हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग होईल असे राऊत यांनी सांगितले. उमेश यादव याचा हा राजकीय बळी असल्याचा आरोप ही राऊत यांनी केला आहे.

उमेश बाबूराव यादव (४५ रा.पोलीस लाईन जवळ सावंतवाडी) हे बुधवारी दुपारपासून घरातून बेपत्ता होते. त्याचा मृतदेह गुरूवारी सकाळी येथील तलावात आढळून आला आहे. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनाचा अहवाल दिला असून, यात त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र उमेश यांने आत्महत्या का केली असावी याबाबत अनेक चर्चांना सावंतवाडी शहरात उधाण आले आहे. उमेश ३१ डिसेंबरनिमित्त कुटूंबासमवेत गोव्याला गेला होता. तेथून काल बुधवारी परतला. त्यानंतर घरात मासे आणून दिले. नंतर त्याने घरी मोबाईल चार्ज करण्यासाठी मोबाईल ठेवला आणि जाऊन येतो म्हणून सांगून गेला तो परतलाच नाही आणि थेट त्याने आत्महत्याच केली. मात्र मौजमजा करणारा व्यक्ती अचानक आत्महत्या कशासाठी करेल यांचे गुढ अद्याप उलगडत नसल्याचे दिसून येत आहे.


सावंतवाडी पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा मुलीने बेपत्ताची तक्रार दाखल केली होती. मात्र गुरूवारी सकाळी मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी सध्यातरी अक्समित मृत्यूची नोंद केली आहे. तसेच हा तपास सावंतवाडी पोलिसांकडून काढून घेऊन स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर गुरूवारी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधिकारी सावंतवाडी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळांची माहिती घेतली. तसेच उमेश यादव यांच्या कुटूंबाचे जबाब ही घेतले यात यादव यांच्या मुलीने सध्यातरी आमची कोणा विरूध्द तक्रार नाही. आमची मनस्थिती चांगली नाही, असे पोलिसांना सांगितले. तसेच चिठ्ठी पोलिसांकडे देण्याबाबतही तिने असमर्थता दर्शवली. चिठ्ठी आहे ती पण देण्याची आमची मनस्थिती नाही असे पोलिसांना सांगितल्याने पोलिसही थांबले असून, कुटूंब जसे सांगेल त्यावेळी त्याचा जबाब घेऊ असे स्पष्ट केले.


दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कणकवलीचे पोलिस उपअधीक्षक नितीन काटेकर यांना सावंतवाडीत पाठवून देण्यात आले असून, त्याच्या देखरेखीखाली हा तपास सुरू आहे. तसेच यादव कुटूंबावर कोणी दबाव आणू नये यासाठी कुटूंबाला पोलिस संरक्षणही देण्यात आले आहे. त्याच्या कुटूंंबाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने एक पोलिस असेल असे पोलिस उपअधीक्षक नितीन काटेकर यांनी सांगितले. तसेच ही आत्महत्या कोणत्या कारणातून झाली यांचा तपशील अद्याप आम्हाला मिळाला नसून,कैटुबिक कि राजकीय यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. पोलिस आपल्या पध्दतीने काम करत आहे. कुटूंबाला पूर्ण विश्वास दिल्याचे ही त्यानी सांगितले. दरम्यान, उमेश यादव यांचा मृतदेह सकाळी मिळाल्यानंंतर येथील कुटीर रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह कुटूंबाच्या ताब्यात देण्यात आला आहे. मृत उमेश यांच्या मागे पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे.

घटनेबाबत सावंतवाडी शहरात उलटसुलट चर्चा
उमेश यादव यांची आत्महत्येची घटना बुधवारी घडल्यानंतर शहरात अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. तसेच चिठ्ठीत अनेकांची नावे आहेत. असेही सांगण्यात येत आहे. पण पोलिसांनी अशी कोणतीही चिठ्ठी आमच्याजवळ आली नाही. त्यामुळे या सर्व सध्यातरी अफवा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी ही घटनेचे गांभीर्य ओळखून जलद गतीने तपास सुरू केला आहे.



शिवसेनेकडून कुटूूंबाचे सात्वन पोलिसांची भेट
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी दुपारी यादव कुटुंबीयांची भेट घेउन कुटूंबाचे सात्वन केले. त्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलिसांची भेट घेतली यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, अ‍ॅड. निता सावंत कविटकर,चंद्रकांत कासार, नगरसेवक बांबू कुडतरकर, भारती मोरे, श्रृतिका दळवी आदि उपस्थीत होते. यावेळी शिवसेनेच्या शिष्ठमंडळा समोर सहाय्यक पोलिस निरिक्षक स्वाती यादव यांनी सखोल तपास करण्यात येणार असून आम्ही कोणाच्या दबावाखाली काम करणार नसल्याचे स्पष्ट केले.

Web Title: The mystery of 'that' suicide in Sawantwadi has increased; Demand for investigation by CID

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.