“ना रुकेंगे, ना थमेंगे”... NCB च्या नांदेड येथील कारवाईनंतर क्रांती रेडकर यांनी टीकाकारांना दिले चोख उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 07:54 PM2021-11-15T19:54:52+5:302021-11-15T19:55:19+5:30
Kranti Redkar Tweet : क्रांती रेडकर यांनी वृत्तसंस्था एएनआयच्या ट्वीटचा स्क्रिनशॉट शेअर करत “ना रुकेंगे, ना थमेंगे”, असे ट्विट पोस्ट केलं आहे. यातून क्रांतीने समीर वानखेडेंवर आरोप करणाऱ्या टीकाकरांना चोख उत्तर दिले आहे.
मुंबई एनसीबीने गुप्त माहितीच्याआधारे नांदेड जिल्ह्यात तब्बल ११२७ किलोग्रॅम गांजा जप्त केला. तसेच २ जणांना अटक केली. यानंतर एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने या कारवाईनंतर चोख प्रतिक्रिया दिली आहे. क्रांती रेडकर यांनी वृत्तसंस्था एएनआयच्या ट्वीटचा स्क्रिनशॉट शेअर करत “ना रुकेंगे, ना थमेंगे”, असे ट्विट पोस्ट केलं आहे. यातून क्रांतीने समीर वानखेडेंवर आरोप करणाऱ्या टीकाकरांना चोख उत्तर दिले आहे.
Na rukenge na thamengey.. 🙏🙏🙏 pic.twitter.com/jxChB5OZvE
— Kranti Redkar Wankhede (@KrantiRedkar) November 15, 2021
एनसीबी अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे ईडीनंतर आता एनसीबी ही तपास यंत्रणाही चर्चेचा विषय बनली आहे. काही दिवसांपूर्वी श्रीनगरहून मुंबईत ड्रग्ज आणणाऱ्या एका टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला होता. त्यानंतर, आता मुंबई एनसीबी पथकाने 1500 किलो गांजा जप्त केला आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे ही कारवाई करण्यात आली.
एनसीबीच्या पथकाला खबऱ्याकडून टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी ट्रकमधून वाहतूक करणाऱ्यात येत असलेला गांजा पकडला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल 1500 किलोचा गांजा जप्त करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशच्या विखाशापट्टणम येथून हा गांजा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी धाड टाकून गांजाची पोती ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे, अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिलीय.