नागपूरात थरार! तरूणाची निर्घृण हत्या करून 'तो' भरवस्तीत पोहचला; संतप्त लोकांनी दगडानं ठेचून टाकला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 05:26 AM2021-07-25T05:26:16+5:302021-07-25T05:31:57+5:30

अजनीतील ‘खून का बदला’ संतापजनक अन् लज्जास्पदही; त्याचा निर्ढावलेपणा, तो वस्तीत पोहचला

In Nagpur after killing the young man, killer reached in area Angry people Murdered him with stones | नागपूरात थरार! तरूणाची निर्घृण हत्या करून 'तो' भरवस्तीत पोहचला; संतप्त लोकांनी दगडानं ठेचून टाकला

नागपूरात थरार! तरूणाची निर्घृण हत्या करून 'तो' भरवस्तीत पोहचला; संतप्त लोकांनी दगडानं ठेचून टाकला

googlenewsNext
ठळक मुद्देजमावाचा रोष, त्याला आडवा केला, पोलीस कुठे होते, शोधाशोध करूनही का नाही दिसले?नागपुरात गल्लीबोळात रोज नवनवीन गुंड तयार होत असतानाचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.आपली दहशत निर्माण व्हावी अन् नंतर कुणी विरोध करू नये, असा उद्देश त्यामागे असतो.

नरेश डोंगरे

नागपूर : अवैध धंदे करणाऱ्या गुंडांना एक तरुण विरोध करतो म्हणून ते गुंड त्या तरुणाची निर्घृण हत्या करतात. यानंतर लोकभावना तीव्र होतात. काही तासांपूर्वीच हत्या करणारा गुंड सिनेमातील खलनायकासारखा निर्ढावलेपणाने वस्तीत पोहोचतो अन् वस्तीतील संतप्त जमाव त्याला हातात मिळेल त्या विटा, दगडाने, दांडक्याने ठेचून टाकतात. गुंडांची क्रूरता, त्यांचा निर्ढावलेपणा, लोकांचा संताप अन् सुटलेला धीर तसेच पोलिसांचा नेभळटपणा उजेडात आणणारी ही घटना शनिवारी सकाळी नागपुरातील अजनीत घडली. या घटनेमुळे समाजमन ढवळून निघाले आहे.

खर्रा दिला नाही, दारू प्यायला पैसे दिले नाही, रागावून बघितले, इतक्या क्षुल्लक कारणावरून नागपुरात हत्येच्या घटना घडतात. अपहरण करून हत्या करण्याचे, गुंडांच्या आपसी वैमनस्यातून, जमिनीच्या वादातून आणि घरगुती वादातून हत्या होण्याचे प्रकार सर्वत्र घडतात. नागपुरातही ते घडायचे. मात्र, यापूर्वीचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सध्या कार्यरत असलेले पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी धडाकेबाज ॲक्शन प्लॅन तयार केला. त्यानुसार, नागपुरातील सर्वच मोठ्या गुन्हेगारी टोळ्यांचे म्होरके आणि त्यांच्या इशाऱ्यावर गुन्हे करणाऱ्या गुंडांवर मकोका, एमपीडीएसारखी कडक कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले आहे. काहींना हद्दपार करून शहरातून पिटाळून लावले आहे. असे असूनही नागपुरात गल्लीबोळात रोज नवनवीन गुंड तयार होत असतानाचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. दारूचे गुत्ते, मटक्याचे अड्डे, जुगार अड्डे चालवून, छोट्या दुकानदारांकडून हप्ता वसुली करून हे गुंड पैसे मिळवतात अन् नंतर परिसरातील महिला-मुलींच नाही तर विरोध करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरतात. कुणी विरोध केल्यास त्याला भरवस्तीत मारले जाते. आपली दहशत निर्माण व्हावी अन् नंतर कुणी विरोध करू नये, असा उद्देश त्यामागे असतो.

स्वत:ला शक्तिमान म्हणवून घेणारा अजनीतील शिवम गुरूदेव नामक अवघ्या १९ वर्षांचा गुंडही असाच करीत होता. त्याला विरोध करणाऱ्या स्वयंदीप नगराळे नामक तरुणाची त्याने शुक्रवारी रात्री हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने त्या भागातील नागरिकांना यापुढे विरोध केल्यास असेच हाल करेन, अशी धमकीही दिली. त्याच्या निर्ढावलेपणाचा कळस म्हणजे, हत्या करून आठ तास होत नाही तोच तो वस्तीत परतला. त्याचा तो निर्ढावलेपणा कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात नेणारा होता. झालेही तसेच. निरागस स्वयंदीपच्या हत्येने शोकविव्हळ झालेल्या परिसरातील जमावाने शक्तिमानवर झडप घातली अन् तेवढ्याच निर्दयपणे त्याला दगड, धोंडे, विटा, दांडक्याने ठेचून काढले.

टळला असता गुन्हा

अवघ्या दहा तासांत एकाच वस्तीत दोनवेळा थरार घडला. यातून पोलिसांचा नेभळटपणा धडधडीतपणे पुढे आला. सोबतच अनेक प्रश्नही
रात्री स्वयंदीपची हत्या केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी धावपळ केली असेल तर त्यांना शक्तिमान का सापडला नाही. आरोपी शक्तिमान त्याच्या मामाच्या भांडेप्लॉटमधील घरी जाऊन लपला. पोलिसांना ते का कळले नाही? असाही प्रश्न आहे. हत्येच्या घटनेनंतर परिसरात बंदोबस्त लावण्यात आला होता. सकाळी जेव्हा तो गुंड काैशल्यानगरात पोहोचला तर पोलिसांना का दिसला नाही. पोलिसांनी त्याला शोधून त्याच्या वेळीच मुसक्या बांधल्या असत्या तर ही घटना टाळता आली असती

अक्कू, ईकबाल अन् शक्तिमान

अनेक महिला-मुलींची अब्रू लुटणारा जरीपटक्यातील कुख्यात गुंड अक्कू यादवची कस्तुरबानगरातील महिला-पुरुषांनी १३ ऑगस्ट २००४ला न्यायमंदिर परिसरात निर्घृण हत्या केली होती. वसंतराव नाईक झोपडपट्टी, सीताबर्डी येथे राहणाऱ्या कोणत्याही कुटुंबातील महिला-मुलगी मनात येईल तेव्हा उचलून नेणाऱ्या कुख्यात भुरू गँगचा गुंड ईकबाल शेख याची ऑक्टोबर २०१२ मध्ये संतप्त जमावाने अशीच हत्या केली होती. आता शक्तिमान नामक गुंडाबाबत असेच झाले. लोकांनी या गुंडांना ठेचून टाकणे, म्हणजे जनतेने केलेला ताबडतोब फैसला ठरतो. मात्र, पोलिसांसाठी हा फैसला लज्जास्पद ठरला आहे.

Web Title: In Nagpur after killing the young man, killer reached in area Angry people Murdered him with stones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.