नागपुरातील स्फोट प्रकरण: चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या संचालक व व्यवस्थापकाला अटक

By योगेश पांडे | Published: June 14, 2024 02:02 PM2024-06-14T14:02:03+5:302024-06-14T14:03:23+5:30

दोघांविरोधातही गुन्हा दाखल; स्थानिकांमध्ये प्रचंड आक्रोश व संतापाचा सूर

Nagpur blast case: Director and manager of Chamundi Explosives Company arrested | नागपुरातील स्फोट प्रकरण: चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या संचालक व व्यवस्थापकाला अटक

नागपुरातील स्फोट प्रकरण: चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या संचालक व व्यवस्थापकाला अटक

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: धामना येथील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात सहा जणांचा जीव गेला. या प्रकरणात पोलिसांनी कंपनीचा मालक जय शिवशंकर खेमका व व्यवस्थापक सागर देशमुख यांना अटक केली आहे. या दोघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यांची कलमे लक्षात घेता त्यांना लवकर जामीन मिळेल अशीच शक्यता वर्तविण्यात येत आहे.

१३ जून रोजी धामना येथील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या कंपनीत गनपावडर पासून सेफ्टी फ्युज व मायक्रोकॉर्डचे उत्पादन केले जात होते. या स्फोटात पन्नालाल बंदेवार, शीतल आशीष चटक, प्रांजली श्रीकांत फलके, वैशाली आनंदराव क्षीरसागर, मोनाली शंकर अलोने, प्रांजली किसन मोदरे यांचा मृत्यू झाला. तर प्रमोद मुरलीधर चवारे, श्रद्धा वनराज पाटील, दानसा फुलनसा मरसकोल्हे हे गंभीर जखमी झाले.

या स्फोटामुळे धामना व परिसरात आक्रोश तसेच संतापाचा सूर होता. या प्रकरणात पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली व व्यवस्थापकाला ताब्यात घेतले होते. पन्नालाल बंदेवार यांचा मुलगा अनुराग बंदेवार (२८) याने या प्रकरणात हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी जय शिवशंकर खेमका व सागर देशमुख यांच्याविरोधात कलम २८६, ३०४-अ व ३३८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे संचालक व व्यवस्थापकांनी कामगारांना योग्य सुरक्षा यंत्रणा न पुरविल्याचा ठपका लावण्यात आला आहे.

Web Title: Nagpur blast case: Director and manager of Chamundi Explosives Company arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.