बोंंबला! वरात मंडपात आल्यावर पोलिसांना फोन करत नवरी म्हणाली, मुलगा पसंत नाही आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 05:50 PM2021-07-16T17:50:48+5:302021-07-16T17:53:12+5:30
तरूणीने वेळेवर केलेल्या कारनाम्यामुळे तिचे घरातील लोक भडकले. ज्यामुळे चांगलाच वादही झाला.
नागपूरमध्ये एका परिवाराने मुलीचं जबरदस्ती एका तरूणासोबत लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला तर तरूणीने थेट पोलिसांना फोन करत बोलवून घेतल्याची घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यात एका तरूणीने लग्नाच्या अखेरच्या क्षणाला पोलिसांना फोन केला आणि सांगितलं की, ज्याच्यासोबत तिचं लग्न होत आहे तो तिला पसंत नाही. पोलिसांनी हे लग्न थांबवलं.
एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे लग्न मंगळवारी दुपारी १२ वाजता रामटेकजवळ एका रिसॉर्टमध्ये होणार होतं. मुहूर्ताच्या काही क्षणांआधी तरूणीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला आणि म्हणाली की, तिला हे लग्न करायचं नाहीये. कारण तिचं दुसऱ्या तरूणावर प्रेम आहे. ज्याच्यासोबत लग्न जुळलं तो मुलगा तिला पसंत नाही. (हे पण वाचा : तरूणाने 'हीर-रांझा'लाही टाकले मागे, पत्नी दूर गेल्याच्या दु:खात केली आत्महत्या)
तरूणीने वेळेवर केलेल्या कारनाम्यामुळे तिचे घरातील लोक भडकले. ज्यामुळे चांगलाच वादही झाला. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही परिवाराच्या सदस्यांना रामटेक पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. त्यानंतर नवरदेवाचे भडकलेले नातेवाईक शांत झाले आणि लग्न रद्द करण्यात आलं. एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तरूणीने एक आठवड्यापूर्वीच आईला सांगितलं होतं की, तिला त्या मुलासोबत लग्न करायचं नाहीये. मात्र, घरातील लोक जबरदस्तीने तिचं लग्न लावून देत होते.