अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार, वडिलांना पाठविला Video; आरोपी अटकेत
By योगेश पांडे | Updated: March 10, 2024 17:30 IST2024-03-10T17:30:04+5:302024-03-10T17:30:53+5:30
प्रज्योत हरीहर बंडोले असे २० वर्षीय आरोपीचे नाव, नागपूरच्या शांतीनगरची घटना

अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार, वडिलांना पाठविला Video; आरोपी अटकेत
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: एका १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. तिने लग्नाबाबत विचारले असता वाद घालत थेट तिच्या वडिलांनाच व्हिडीओ पाठविला. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
प्रज्योत हरीहर बंडोले (२०, शांतीनगर) असे आरोपीचे नाव आहे. १६ वर्षीय मुलीशी त्याने प्रेमसंबंध निर्माण केले. त्याने तिला लग्नाचे वचन दिले. २४ नोव्हेंबर २०२३ ते ४ मार्च या कालावधीत त्याने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्याचे त्याने फोटो व व्हिडीओदेखील काढले. त्यानंतर त्यांचा वाद झाला असता प्रज्योतने त्याच्याजवळील व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
इतक्यावरच तो थांबला नाही, तर त्याने मुलीच्या वडिलांना व्हिडीओ पाठविला. तो पाहून त्यांच्या पायाखालील जमीनच सरकली. मुलीच्या आईने शांतीनगर पोलीस ठाणे गाठत प्रज्योतविरोधात तक्रार केली. पोलिसांनी पोक्सो तसेच आयटी ॲक्टअंतर्गत गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली.