अतिक अहमद सोडा, कुख्यात अक्कू यादवला तर भर कोर्टात कापलं होतं; जाणून घ्या ते भयंकर प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 06:26 PM2023-04-20T18:26:28+5:302023-04-20T18:26:56+5:30

19 वर्षांपूर्वी नागपूरमध्ये भर कोर्टात न्यायधीशांसमोर अक्कूला महिलांनी कापलं होतं.

Nagpur notorious Akku Yadav was cut off in court; Know the terrible case | अतिक अहमद सोडा, कुख्यात अक्कू यादवला तर भर कोर्टात कापलं होतं; जाणून घ्या ते भयंकर प्रकरण...

अतिक अहमद सोडा, कुख्यात अक्कू यादवला तर भर कोर्टात कापलं होतं; जाणून घ्या ते भयंकर प्रकरण...

googlenewsNext

प्रयागराजमध्ये पोलीस संरक्षणात असलेल्या माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मीडियाच्या कॅमेऱ्यासमोरच हत्या झाल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सरकारवर विरोधक सतत टीका करत आहेत. दरम्यान, 19 वर्षांपूर्वी अशाच प्रकारची एक हत्या झाली होती, पण ती हत्या चक्क कोर्टात न्यायाधीशांसमोर घडला होता. ज्याची हत्या झाली तो अतिशय क्रुर गुंड होता, ज्याने कैक महिला-तरुणींवर बलात्कार केला होता. 

13 ऑगस्ट 2004 रोजी भरत कालीचरण उर्फ ​​अक्कू यादव याला नागपूर न्यायालयात हजर करण्यात आले. अक्कू यादव हा सीरियल किलर आणि बलात्कारी होता. सुनावणीदरम्यान यादव याला लोखंडी दरवाजाआड कैद होता. यादव याच्यासोबत फक्त दोन पोलीस हवालदार होते. यावेळी अचानक सुमारे 400 ते 500 लोकांच्या जमावाने कोर्टाचा लाकडी दरवाजा तोडून अक्कूवर हल्ला केला. यावेळी हे सर्व लोक दगड, चाकू, काचेच्या बाटल्या, आरसा आणि अनेक प्रकारची शस्त्रे घेऊन कोर्टात घुसले. त्या सगळ्यांनी अक्कू यादववर हल्ला केला आणि भरदिवसा कोर्ट रुममध्येच त्याची हत्या करण्यात आली. ज्या दिवशी अक्कूची हत्या झाली, त्या दिवशी त्याच्या जामीनावर निर्णय होणार होता.

त्या दिवशी कोर्टात काय घडलं?
सुनावणीला अजून सुरुवातही झाली नव्हती की आजूबाजूच्या भागात बातमी पसरली की कोर्ट अक्कू यादवची सुटका करणार आहे. यानंतर शेकडो महिलांनी चाकू, मिरची पावडर घेऊन मोर्चा काढला. काही वेळातच महिला कोर्ट रुममध्ये आल्या आणि समोरच्या सीटवर बसल्या. यादव याला दुपारी अडीच ते तीन या वेळेत न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टात येताच यादव याची नजर एका महिलेवर पडली. या महिलेवर यादवने बलात्कार केला होता. महिलेला पाहताच यादवने तिची चेष्टा केली, तिला वेश्या म्हणत पुन्हा तिच्यावर बलात्कार करणार असे ओरडला. हे ऐकून पोलीस हवालदार हसले.

पुढच्याच क्षणी समोरच्या महिलेने पायातली चप्पल काढून यादव यांच्या डोक्यात मारली. काही वेळातच 400-500 महिलांचा जमाव यादव याच्यावर तुटून पडला. कोर्ट रूममध्येच महिलांनी यादवला मारहाण सुरू केली. त्याच्यावर चाकूने 70 वेळा वार करण्यात आले, त्याच्या चेहऱ्यावर मिरची पावडर टाकली, दगडाने चेहरा ठेचला. त्याच्या संरक्षणात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या तोंडावरही मिरची पावडर फेकण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडितांपैकी एकाने यादवचा प्रायव्हेट पार्टही कापला. पोलिसांनीही घाबरुन घटनास्थळावरून पळ काढला. 

कोण होता अक्कू यादव
भरत उर्फ ​​अक्कू कालीचरण यादव हा 1980 आणि 1990 च्या दशकात नागपुरात गुंड होता. 2005 मध्ये प्रकाशित झालेल्या कॉमनवेल्थ ह्युमन राइट्स इनिशिएटिव्ह रिपोर्ट (CHRI) नुसार, यादव याच्या मृत्यूच्या वेळी त्याच्यावर 26 गंभीर गुन्हे दाखल होते. यादव याच्यावर सामूहिक बलात्कार, खून, सशस्त्र दरोडा, घरफोडी, गुन्हेगारी धमकी आणि खंडणी यांसारखे गुन्हे दाखल आहेत. मरताना यादव 32 वर्षांचा होता आणि तो एक दशकाहून अधिक काळ त्याने परिसरात भीती पसरवली होती. अवघ्या 15 मिनिटांत या राक्षसाचा अंत झाला होता.

Web Title: Nagpur notorious Akku Yadav was cut off in court; Know the terrible case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.