प्रेयसीला सासरी जाताना बघू शकला नाही माथेफिरू प्रियकर, रस्त्यात अडवून झाडली तिच्यावर गोळी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 10:59 AM2021-05-31T10:59:43+5:302021-05-31T11:01:47+5:30
दोघांनाही नंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तरूणीला मृत घोषित करण्यात आलं. तर तरूणाची स्थिती गंभीर होती. नंतर त्याचाही मृत्यू झाला.
नालंदा जिल्ह्यातील एका माथेफिरू रोडरोमिओने आपल्या प्रेयसीची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नालंदा जिल्ह्यातील रहुई भागाती आहे. आपल्या माहेरून सासरी जात असलेल्या नवविवाहितेला त्याने रस्त्यात अडवलं आणि तिच्यावर गोळी झाडली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेतली. दोघांनाही नंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तरूणीला मृत घोषित करण्यात आलं. तर तरूणाची स्थिती गंभीर होती. नंतर त्याचाही मृत्यू झाला.
मीडिया रिपोर्टनुसार, तरूणीचं लग्न चार दिवसांआधी २६ मे रोजी शाहपूर गावात झालं होतं. ती लग्नानंतर तिच्या सासरी जात होती. यादरम्यान माथेफिरू प्रियकराने तिला रस्त्यात अडवून तिची हत्या केली. माहिती मिळताच डीएसपी संजय कुमार घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तरूणाची बाईक आणि हत्येसाठी वापरलेली पिस्तुल ताब्यात घेतली. (हे पण वाचा : प्रेमात धोका मिळाला म्हणून प्रियकरानं प्रेयसीचा काटाच काढला; हत्येचा ‘असा’ रचला कट, पोलिसही चक्रावले)
इकडे पती पत्नीला सासरी घेऊन जात होता. याची माहिती तिच्या प्रियकराला लागली. त्यानंतर माथेफिरू प्रियकर बाईकने स्कार्पिओ गाडीचा पाठलाग करत गेला. तो एका पुलाजवळ ओव्हरटेक करून गाडीसमोर थांबला. आधी त्याने प्रेयसीवर गोळी झाडली त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेतली.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तरूणीच्या हातावरील मेहंदीचा रंगही उतरला नव्हता की, माथेफिरू प्रियकराने प्रेयसीचा जीव घेतला. सुदैवाने या माथेफिरू प्रियकराने प्रेयसीच्या पतीला जिवंत सोडलं. (हे पण वाचा : स्वत:च्याच घरात फोनवर बोलत होती महिला; पोलिसांनी 27 हजारांचा दंड केला)
मीडिया रिपोर्टनुसार, माथेफिरू प्रेमी आणि नवविवाहित तरूणीचं अनेक वर्षापासून प्रेमप्रकरण सुरू होतं. पण कुटुंबियांनी मुलीचं लग्न २६ मे रोजी विकास कुमार नावाच्या तरूणासोबत करून दिलं. हीच बाब माथेफिरू प्रियकराला सहन झाली नाही. त्याने रागाच्या भरात हे धक्कादायक कृत्य केलं.