Nalasopara Arms Haul : अखेर शरद कळसकरचा ताबा सीबीआयकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 06:16 PM2018-09-03T18:16:35+5:302018-09-03T18:34:56+5:30
न्यायालयाने वैभव आणि सुधन्वा यांना १५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
मुंबई - नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतसह सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकरची आज पोलीस कोठडी संपली असून त्यांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने वैभव आणि सुधन्वा यांना १५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी आरोपी शरद कळसकरला न्यायालयाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कोठडीत पाठवले आहे. मागील सुनावणीत न्यायालायने सीबीआयला याप्रकरणी धारेवर धरले होते. तसेच पुधिक तपासासाठी श्रीकांत पांगारकरच्या पोलीस कोठडीत ६ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आहे.
नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी एटीएसने अटक केलेल्या शरद कळसकर यास सीबीआय कोठडी देण्याची मागणी अखेर मुंबई हायकोर्टाने मान्य केली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी कळसकरचा ताबा सीबीआयने मागितला होता. मात्र यापूर्वीच्या सुनावणींमध्ये न्यायालयाने सीबीआयची ही मागणी फेटाळून लावली होती. दाभोलकर हत्येतील गोळी झाडणारा आरोपी म्हणून पकडलेला सचिन अंदुरे व कळसकरची समोरासमोर चौकशी करण्यासाठी ही कोठडी आवश्यक असल्याचे सीबीआयचे म्हणणे होते. आता न्यायालयाने सीबीआयची मागणी मान्य केल्यामुळे कळसकर आणि अणदुरे यांची एकत्र चौकशी करून घटनाक्रम जुळवण्याचा व हत्येच्या कटात मुळाशी जाण्याचा सीबीआयचा प्रयत्न असेल.
Mumbai: Sharad Kalaskar,an accused in terror conspiracy case, has been sent to CBI custody now for investigation in Narendra Dabholkar murder matter
— ANI (@ANI) September 3, 2018