नालासोपाऱ्यात खळबळ ! अल्पवयीन मुलीचे अपहऱण करून केले लैंगिक शोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 20:41 IST2019-03-27T20:37:37+5:302019-03-27T20:41:12+5:30
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.

नालासोपाऱ्यात खळबळ ! अल्पवयीन मुलीचे अपहऱण करून केले लैंगिक शोषण
वसई - अल्पवयीय मुलीच्या अपहरणानंतर तिच्यावल बलात्कार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर नालासोपाऱ्यात आज तणाव निर्माण झाला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.
नालासोपारा पूर्वेला राहणाऱ्या ६ वर्षीय चिमुरड्या मुलीचे सोमवारी रात्री अपहरण करण्यात आले होते. यामुळे परिसरात तणाव होता. त्यातच दुसऱ्या दिवशी ही मुलगी महामार्गाजवळच्या जंगलात बेशुध्द अवस्थेत आढळून आली. तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले. त्यानंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. जमाव रस्त्यावर उतरला आणि संतोष भुवन परिसरात बंद पाडला. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी पोलीस कुमक पाठवून बंदोबस्त ठेवला. स्थानिकांनी काही काळ बंद पाळून या घटनेचा निषेध केला होता. मात्र नंतर पोलिसांनी मध्यस्ती करून बंद केलेली दुकाने उघडायला लावली. याप्रकऱणी पोलिसांनी ६ संशयितांना ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकड्या तैनात कऱण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील आरोपीला लवकरच अटक करू असे पोलिसांनी सांगितले आहे.