राजीव गांधी हत्येतील दोषी नलिनीचा आत्महत्येचा प्रयत्न; २९ वर्षांपासून आहे तुरुंगात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 02:16 PM2020-07-21T14:16:32+5:302020-07-21T14:19:19+5:30
काल रात्री या प्रकरणात नलिनीचा जेलरशी वाद झाला. त्यानंतर नलिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला पण तुरूंगातील कर्मचाऱ्यांनी तिला अडवले.
नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या घडवून आणण्यात हात असल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली नलिनी श्रीहरन हिने जेलरशी झालेल्या शाब्दिक चकमकीदरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या नलिनी श्रीहरन हिने सोमवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला. तिचे वकील पी.पुगाझेंडी यांच्या म्हणण्यानुसार, नलिनीला तिच्या कक्षातील आणखी एक कैदी अन्यत्र हलविण्यात यावे अशी इच्छा आहे, कारण त्या दोघांमध्ये सतत भांडण होत आहे. काल रात्री या प्रकरणात नलिनीचा जेलरशी वाद झाला. त्यानंतर नलिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला पण तुरूंगातील कर्मचाऱ्यांनी तिला अडवले.
राजीव हत्या प्रकरणात नलिनीच्या पतीसह 6 दोषी
नलिनी तामिळनाडूच्या वेल्लोर तुरूंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. 1991 पासून म्हणजे 29 वर्षांपासून तो तुरूंगात आहे. त्याची मुलगीही तुरूंगात जन्मली होती. यासह राजीव गांधी हत्याकांडातील अन्य सहा दोषींनाही शिक्षा सुनावली जात आहे. नलिनी हिचा पती मुरुगन हेही दोषींपैकी एक आहेत.
नलिनीची फाशीची शिक्षेचे 20 वर्षांपूर्वी जन्मठेपेच्या शिक्षेत बदलली
माजी पंतप्रधान राजीव गांधी 21 मे 1991 रोजी तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूर येथे निवडणूक रॅली दरम्यान एलटीटीईच्या आत्मघाती हल्ल्यात शहीद झाले होते. या प्रकरणात नलिनीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु तामिळनाडू सरकारने तिची शिक्षा 24 एप्रिल 2000 रोजी जन्मठेपात बदलली.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात नलिनी तुरुंगाबाहेर आली आहे. नलिनीला मद्रास उच्च न्यायालयाने 30 दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. त्यानंतर गुरुवारी सकाळी नलिनीला कारावासातून बाहेर सोडण्यात आले. मुलीच्या विवाहाची पूर्वतयारी करण्यासाठी नलिनीने मद्रास हायकोर्टाकडे सहा महिन्यांच्या पॅरोलची मागणी केली होती. अखेरीस तिला 30 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता.
राजीव गांधी हे 1991 च्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रचारासाठी तामिळनाडू येथील श्रीपेराम्बदूर येथे आले असताना लिट्टेच्या दहशतवाद्यांनी मानवी बॉम्बच्या मदतीने स्फोट घडवून त्यांची हत्या घडवून आणली होती. त्यानंतर या प्रकरणातील आरोपी असलेल्या पेरारीवलन, मुरुगन, नलिनी, शांतन, रविचंद्रन, जयकुमार आणि रॉबर्ट पायस यांना अटक करण्यात आली होती. पुढे गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्यांन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
दरम्यान, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी हिने मुलीच्या विवाहासाठी सहा महिन्यांच्या पॅरोलची मागणी केली होती. पण कोर्टाने नलिनी हिला केवळ 30 दिवसांचा पॅरोल मंजुर केला आहे. प्रत्येक व्यक्तीला दोन वर्षांचा तुरुंगवास भोगल्यानंतर एक महिन्याची सामान्य सुट्टी मिळते. मात्र मी गेल्या 27 वर्षांपासून एकदाही सुट्टी घेतलेली नाही. त्यामुळे मला पॅरोल देण्यात यावा, अशी मागणी नलिनी हिने केली होती.
काही दिवसांपूर्वी तामिळनाडू सरकारने राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 7 दोषींची सुटका करण्यात येईल, असे आश्वासन मद्रास उच्च न्यायालयाला दिले होते. दरम्यान, घटनेतील कलम 161 अंतर्गत सातही दोषींना मुक्त करण्यात यावे अशी मागणी डीएमकेचे अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी केले होते.
Nalini, convict in Rajiv Gandhi assassination case, attempted suicide in Vellore prison. Her lawyer says, "We want inquiry into it as she never showed such an attitude during her 30-year incarceration. We request CM to move her to Puzhal prison. She isn't safe in Vellore prison." pic.twitter.com/afg9JWacFF
— ANI (@ANI) July 21, 2020
नवी दिल्ली - माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्याकांडाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या दोषी नलिनी श्रीहरन यांनी तुरुंगात केला आत्महत्येचा प्रयत्न pic.twitter.com/veXlJtLFet
— Lokmat (@MiLOKMAT) July 21, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या...
मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा
Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा
दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या
वेदनादायी! शेतात घुसली म्हणून सांडणीचे कुऱ्हाडीनं कापले पाय; तडफडत सोडला जीव
एल्गार परिषद : वरावरा राव यांच्या प्रकृतीचा अहवाल द्या
दुर्घटना टळली! पश्चिम रेल्वे मार्गावर एक्सप्रेस आणि ट्रकचा अपघात, जीवितहानी नाही