अशी ही बनवाबनवी! नाव एक पण काम अनेक; शिक्षिकेने अवघ्या १३ महिन्यांत कमवले १ कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 11:15 AM2020-06-05T11:15:50+5:302020-06-05T11:25:29+5:30
मैनपुरी येथील रहिवासी अनामिका ज्या शाळांमध्ये 'काम' केलं त्या शाळांच्या नोंदीनुसार, ती एका वर्षापेक्षा जास्त काळ नोकरीला आहे.
लखनऊ - उत्तर प्रदेशमधील कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयात विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षिकेने एकाच वेळी २५ शाळांमध्ये कथित स्वरुपात काम करून अवघ्या १३ महिन्यांत १ कोटी रुपये पगार कमवला आहे. शिक्षकांचा डेटाबेस तयार करताना हा प्रकार उघडकीस आला. यूपीच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या हजेरीचे रिअल टाइम मॉनिटरिंग करुनही अनामिका शुक्ला नावाच्या या शिक्षिकेने तसे केले. या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.
मैनपुरी येथील रहिवासी अनामिका ज्या शाळांमध्ये 'काम' केलं त्या शाळांच्या नोंदीनुसार, ती एका वर्षापेक्षा जास्त काळ नोकरीला आहे. शालेय शिक्षण महासंचालक विजय किरण आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिक्षिकेसंदर्भात चौकशी सुरू केली आहे. जेव्हा सर्व शिक्षकांना प्रेरणा पोर्टलवर आपली हजेरी ऑनलाईन नोंदवायची असेल त्यावेळी एक शिक्षक अनेक ठिकाणी नोंदणी कशी करू शकतात. या संदर्भात सविस्तर चौकशी होणे आवश्यक आहे.
मार्चमध्ये अनामिका शुक्लाविरूद्ध तक्रार मिळाल्यानंतर याचा खुलासा झाला. विजय किरण आनंद यांनी सांगितले की, आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. लॉकडाऊनमुळे शिक्षकांच्या नोंदी आढळू शकल्या नाहीत. मी २६ मे रोजी याबाबत अधिकाऱ्यांना पुन्हा स्मरण केले. जर या प्रकरणात शिक्षिका दोषी आढळल्यास कडक कारवाई करणार असा इशारा त्यांनी दिला.
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज, आंबेडकरनगर, अलिगड, सहारनपूर, बागपत अशा जिल्ह्यांतील केजीबीव्ही शाळांमध्ये अनामिकाची पोस्टिंग आढळली आहे. या शाळांमध्ये शिक्षकांची नेमणूक कंत्राटी पद्धतीने केली जाते आणि दरमहा ३० हजार रुपये पगार दिला जातो. जिल्ह्यातील प्रत्येक गटात कस्तुरबा गांधी शाळा आहे. या शाळांमध्ये समाजातील दुर्बल घटकांमधून आलेल्या मुलींसाठी निवासी सुविधादेखील आहेत.
अनामिका शुक्ला फेब्रुवारीपर्यंत रायबरेलीच्या केजीबीव्हीमध्ये काम करताना ही बाब उघडकीस आली. सर्व शिक्षा अभियानाच्या वतीने रायबरेलीचे बेसिक शिक्षण अधिकारी आनंद प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा जिल्ह्यांना पत्र पाठवून केजीबीव्हीमधील अनामिका शुक्ला नावाच्या शिक्षिकेची तपासणी करण्यास सांगितले. रायबरेलीत यांचे नाव त्या यादीमध्ये नसले तरी आम्ही तपासणी केली असता आम्हाला आढळले की, ती महिला आमच्या केजीबीव्हीमध्येही कार्यरत आहे. या संदर्भात तिला नोटीस पाठविली होती.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
बाजारपेठा गजबजणार; राज्यात निर्बंध शिथिल; वाचा काय सुरु राहणार?
...अन् ७ वर्षाच्या मुलीने थेट पोलीस ठाणे गाठलं; घडलेला प्रकार ऐकून पोलीसही हादरले
शेतात काम करताना जमिनीत नांगर अडकला; शेतकऱ्याला सोने-रत्नांचा मोठा खजिना सापडला
फेसबुकनंतर अमेझॉनची भारतात गुंतवणूक; ‘या’ बड्या टेलिकॉम कंपनीसोबत २ अब्ज डॉलर्सचा करार?
कोरोनाच्या नावाखाली लुटालूट; किराणा मालासह अन्य वस्तू चढ्या भावाने