Nanded LET Case : NIA कोर्टाने तिघांना सुनावली १० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा तर दोघांना केले निर्दोष मुक्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 08:54 PM2021-06-15T20:54:37+5:302021-06-15T20:59:33+5:30

Nanded LET Case : हे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) ताब्यात घेतले.

Nanded LET Case: three men get 10 years in jail in 2012 terror case | Nanded LET Case : NIA कोर्टाने तिघांना सुनावली १० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा तर दोघांना केले निर्दोष मुक्त 

Nanded LET Case : NIA कोर्टाने तिघांना सुनावली १० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा तर दोघांना केले निर्दोष मुक्त 

Next
ठळक मुद्देमोहम्मद इरफान आणि मोहम्मद इलियास यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.विशेष न्यायाधीश डी. ई. कोथळीकर यांनी अन्य दोन आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.

एनआयए विशेष न्यायालयाने तीन लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना Nanded LET  प्रकरणात दहा वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) २०१२ मध्ये नांदेड येथून पाच जणांना अटक केली होती. नंतर हे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) ताब्यात घेतले. देशात अशांतता निर्माण करण्यासाठी हिंदू नेत्यांना व पत्रकारांना ठार मारण्याच्या कट रचल्याप्रकरणी २०१२ मध्ये अटक झालेल्या तीन जणांना मंगळवारी येथील विशेष एनआयए कोर्टाने तीन जणांना शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश डी. ई. कोथळीकर यांनी अन्य दोन आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.


कोर्टाने मंगळवारी मोहम्मद अकरम, मोहम्मद मुजम्मिल आणि मोहम्मद सदिक यांना यूएपीए कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवत दहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. मोहम्मद इरफान आणि मोहम्मद इलियास यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.एनआयएनुसार अकरम रोजगाराच्या बहाण्याने सौदी अरेबियाला गेला आणि तेथे वास्तव्याच्या वेळी त्याची ओळख पाकिस्तान लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेच्या विविध सदस्यांशी झाली.

सौदीची राजधानी रियाद येथे नांदेड, हैदराबाद आणि बेंगळुरूसह भारतातील विविध भागांतील प्रमुख हिंदू नेते, पत्रकार आणि पोलिस अधिकाऱ्यांची हत्या घडविण्याच्या उद्देशाने अकरमने आपल्या हँड्लरसह कट रचला होता, अशी माहिती एनआयएने दिली. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली, असे एजन्सीने कोर्टाला सांगितले.

Web Title: Nanded LET Case: three men get 10 years in jail in 2012 terror case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.