नांदेडमध्ये पूर्ववैमनस्य आणि गटबाजीच्या वर्चस्वातून कुख्यात गुन्हेगाराची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 02:22 PM2018-07-26T14:22:04+5:302018-07-26T14:24:09+5:30

कुख्यात गुन्हेगार कृष्णा खाटीक याची हत्या पूर्ववैमनस्यातून तसेच गटबाजीमध्ये वर्चस्वाच्या भांडणातून झाल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात उघड झाले.

In Nanded murder of infamous criminal in gang war | नांदेडमध्ये पूर्ववैमनस्य आणि गटबाजीच्या वर्चस्वातून कुख्यात गुन्हेगाराची हत्या

नांदेडमध्ये पूर्ववैमनस्य आणि गटबाजीच्या वर्चस्वातून कुख्यात गुन्हेगाराची हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देकुख्यात गुन्हेगार कृष्णा खाटीक याचे ३० मार्च २०१८ रोजी मालेगाव हद्दीतील स्वराज्य ढाब्यावरुन अपहरण करण्यात आले होते.त्याचा खून करुन प्रेत जाळून टाकून पुरावा नष्ट केल्याचे दिसून आले होते. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

नांदेड : कुख्यात गुन्हेगार कृष्णा खाटीक याची मालेगाव हद्दीतील स्वराज्य ढाबा येथून अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. सदर गुन्हा पूर्ववैमनस्यातून तसेच गटबाजीमध्ये वर्चस्वाच्या भांडणातून झाल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

कुख्यात गुन्हेगार कृष्णा खाटीक याचे ३० मार्च २०१८ रोजी मालेगाव हद्दीतील स्वराज्य ढाब्यावरुन अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा खून करुन प्रेत जाळून टाकून पुरावा नष्ट केल्याचे दिसून आले होते. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना व पोलीस निरीक्षक शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.या घटनेसंबंधी गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेवून पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. 

याप्रकरणी लखन दशरथसिंह ठाकूर, विक्की दशरथसिंह ठाकूर, ईश्वरसिंह जसवंतसिंह गिरणीवाले (सर्व रा. चिखलवाडी), विक्की राम चव्हाण (कुंभारगल्ली), विशाल ऊर्फ ए.व्ही. आंबे, सौरभ ऊर्फ दीपक संजय टाकळीकर (रा.शिवशक्तीनगर), रवी नारायणसिंग ठाकूर (रा. रविनगर, जुना कौठा) यांच्यासह तीन बालगुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विनोद दिघोरे, पोउपनि कल्याण नेहरकर, सदानंद वाघमारे, पोलीस जमादार दशरथ जांभळीकर यांच्यासह पोलीस शिपाई बालाजी सातपुते, राजू पांगरीकर, जसवंतसिंघ शाहू, रमेश खाडे, माधव केंद्रे, संग्राम केंद्रे, धोंडिबा केंद्रे, मनोज परदेशी, मोतीराम पवार, चालक श्रीरामे आदींनी तपासासाठी विशेष परिश्रम घेतले. सदर खून प्रकरणातील प्रमुख आरोपी विक्की चव्हाण हा सध्या नांदेड कारागृहात असून त्याचा  हस्तक विक्की दशरथसिंह ठाकूर व ईश्वरसिंग जसवंतसिंग गिरणीवाले हे सध्या फरार आहेत. पोलीस पथक आरोपींचा शोध घेत आहे.

पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून जाळले
कृष्णा खाटीकसह आरोपी असलेले यांच्यात गुन्हेगारी गट होते. या गटात पूर्ववैमनस्य तसेच वर्चस्वाचे भांडण सुरू होते. यातूनच कृष्णा खाटीकची हत्या करण्यात आली. आरोपी चार मोटारसायकलवरुन खाटीक याचा शोध घेत होते. ३० मार्च रोजी कृष्णा खाटीक यास ढाब्यावरुन जबरीने पकडून खंजीरने मारहाण करण्यात आली. त्यानंतर मोटारसायकलवर बसून त्याचे अपहरण केले आणि कौठा- असर्जन बायपासच्या नवीन पुलाच्या पश्चिम बाजूस गोदावरी नदी पात्रानजीकच्या बाभळीच्या जंगलात नेवून त्यास जबर मारहाण करण्यात आली. यात कृष्णा खाटीकचा मृत्यू झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या अंगावर लाकडे आणि मोटारसायकल मधील पेट्रोल टाकून जाळण्यात आले.

Web Title: In Nanded murder of infamous criminal in gang war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.