Narada Scam: उच्च न्यायालयाने जामीन नाकारताच ममतांच्या मंत्र्यांची तब्येत बिघडली, तिघे हॉस्पिटलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 11:54 AM2021-05-18T11:54:35+5:302021-05-18T11:56:46+5:30
CBI arrested Mukherjee and 3 others in connection with Narada case yesterday.: ममतांचे सरकार स्थापन होताच, त्यांच्या मंत्र्यांविरोधात नारदा घोटाळ्याची (Narada sting case) पुन्हा चौकशी सुरु झाली आहे. या घोटाळ्यातील आरोपी आणि ममतांचे कॅबिनेट मंत्री फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी आणि आमदार मदन मित्रांसह भाजपाचे माजी नेते सोवन चटर्जी यांच्या घरावर सीबीआयने (CBI) छापेमारी केली होती.
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या दोन मंत्र्यांना आणि एका आमदाराला नारडा घोटाळ्यात सीबीआयने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यामुळे प. बंगालमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून तणावामध्ये सोमवारी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी सीबीआय कार्यालयावर दगडफेक केली. यानंतर या नेत्यांना जामीन मिळाला होता, तो कोलकाता उच्च न्यायालयाने रद्द केल्याने मध्यरात्री या नेत्यांना कारागृहात जावे लागले होते. आता या पैकी तीन नेत्यांची तब्येत बिघडली आहे. (West Bengal: Police brings TMC leader Subrata Mukherjee to SSKM Hospital, Kolkata.)
ममतांचे सरकार स्थापन होताच, त्यांच्या मंत्र्यांविरोधात नारदा घोटाळ्याची (Narada sting case) पुन्हा चौकशी सुरु झाली आहे. या घोटाळ्यातील आरोपी आणि ममतांचे कॅबिनेट मंत्री फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी आणि आमदार मदन मित्रांसह भाजपाचे माजी नेते सोवन चटर्जी यांच्या घरावर सीबीआयने (CBI) छापेमारी केली होती. त्यांना चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतल्याचे समजताच ममता देखील त्यांच्यामागोमाग सीबीआय कार्यालयात गेल्या होत्या. तिथे त्यांनी मलाही अटक करा अशी मागणी करत धरणे आंदोलन केले होते. तर बाहेर कार्यकर्ते संतप्त झाले होते.
सीबीआय चौकशीनंतर या नेत्यांना अटक करण्यात आली होती. यावर त्यांना जामीनही मिळाला होता. मात्र, कोलकाता उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केला होता. यामुळे त्यांना रात्रभर तुरुंगात रहावे लागले होते. नारदा घोटाळ्यात त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर मदन मित्रा आणि सोवन चॅटर्जी यांची तब्येत बिघडली होती. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करत नाही तोच आता सुब्रत मुखर्जी यांचीदेखील तब्येत बिघ़डल्याने त्यांना SSKM हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. तिन्ही नेते या हॉस्पिटलच्या वुडबर्न ब्लॉकमध्ये भरती आहेत.
West Bengal: Police brings TMC leader Subrata Mukherjee to SSKM Hospital, Kolkata.
— ANI (@ANI) May 18, 2021
CBI arrested Mukherjee and 3 others in connection with Narada case yesterday. pic.twitter.com/B8Vg7Nruh9
2017मध्ये उच्च न्यायालयाने दिले होते चौकशीचे आदेश -
उच्च न्यायालयाने 16 एप्रिल 2017 रोजीच स्टिंग ऑपरेशनच्या चौकशीचे आदेश सीबीआयला दिले होते. यानंतर एका विशेष न्यायालयाने तृणमूल काँग्रेसच्या संबधित नेत्यांना जामीन दिली होती. सीबीआयने हे चारही नेते आणि आईपीएस अधिकारी एसएमएच मिर्झा यांच्या विरोधात आरोप-पत्र दाखल केले होते. सध्या मिर्झा जामिनावर आहेत.