Narayan Rane: केंद्रीय मंत्र्याला अटक होऊ शकते? देशभरातील मंत्र्यांमध्ये नारायण राणे तिसरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 09:24 AM2021-08-25T09:24:45+5:302021-08-25T09:25:46+5:30

Narayan Rane Arrest: राज्याच्या पोलीस दलाकडून यापूर्वी दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील दोन मंत्र्यांना अटक करण्यात आली होती. तत्कालीन केंद्रीय मंत्री दिवंगत मुरासोली मारन आणि टी. आर. बालू यांना जून २००१ मध्ये अटक करण्यात आली होती.

Narayan Rane is Third central minister who arrested by state governments | Narayan Rane: केंद्रीय मंत्र्याला अटक होऊ शकते? देशभरातील मंत्र्यांमध्ये नारायण राणे तिसरे

Narayan Rane: केंद्रीय मंत्र्याला अटक होऊ शकते? देशभरातील मंत्र्यांमध्ये नारायण राणे तिसरे

googlenewsNext

- हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपांवरून महाराष्ट्र पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक केली. गेल्या २० वर्षांमध्ये राज्य पोलिसांनी अटक केलेले राणे पहिले केंद्रीय कॅबिनेट मंत्री ठरले आहेत. तर मंत्रीपदावर असताना अटक झालेले तिसरे नेते आहेत. तीनही मंत्री राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडीचेच आहेत.

Narayan Rane: राणे कुटुंबिय कोकणात होते, मग वरुण सरदेसाईंनी आव्हान कोणाला दिले...

राज्याच्या पोलीस दलाकडून यापूर्वी दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील दोन मंत्र्यांना अटक करण्यात आली होती. तत्कालीन केंद्रीय मंत्री दिवंगत मुरासोली मारन आणि टी. आर. बालू यांना जून २००१ मध्ये अटक करण्यात आली होती. दोघांनाही मध्यरात्री चेन्नईमध्ये अतिशय नाट्यमय घडामोडीनंतर अटक करण्यात आली होती. त्यावेळी मारन आणि बालू यांच्यासह माजी मुख्यमंत्री दिवंगत एम. करुणानिधी यांनाही अटक केली होती. त्यानंतर आता राणे यांना अटक झाली आहे. 

Narayan Rane: ...अन् असे घडले अटकनाट्य! भाजपची खेळी फसली; राणे ट्रॅपमध्ये सापडले

मारन आणि बालू यांच्याविरोधात चेन्नईतील १२ कोटी रुपयांच्या ‘फ्लायओव्हर घोटाळ्या’शी संबंधित प्रकरणात ही कारवाई झाली होती. मारन हे त्यावेळ तत्कालीन केंद्रीय उद्योग मंत्री होते.  अटकेदरम्यान मारन आणि बालू दोघेही किरकोळ जखमी झाले होते. दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी तत्कालीन केंद्रीय संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस तातडीने चेन्नईला गेले होते. त्यानंतर या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांची जामिनावर सुटका झाली होती. आता राणे यांना बाहेर काढण्यासाठी भाजपचे नेतृत्व कोणती पावले उचलणार, याकडे लक्ष लागले आहे.

Narayan Rane: राणेंच्या अटकेसाठी परब यांचा दबाव! राज्यभरात काेंबड्या उडवून सेनेचा राणेंवर प्रहार

परिस्थिती वेगळी
तीनही नेत्यांच्या अटकेमागील कारणे आणि परिस्थिती मात्र अतिशय वेगळी आहेत. राणे यांना दिवसाढवळ्या अटक करण्यात आली. तसेच  राणेंची अटक ही गुन्हेगारी प्रकरणात झालेली नाही. याउलट मारन आणि बालू यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. 

Web Title: Narayan Rane is Third central minister who arrested by state governments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.