बलात्कारप्रकरणी नारायण साई दोषी; शिक्षेवर ३० एप्रिलला सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 02:09 PM2019-04-26T14:09:22+5:302019-04-26T14:10:01+5:30
नारायणचा सहकारी गंगा, जमुना आणि हनुमान हे देखील यामध्ये दोषी ठरवण्यात आले आहेत.
सुरत - २०१३ सालच्या सुरतमध्ये झालेल्या बलात्कारप्रकरणी आसारामचा मुलगा नारायण साईला न्यायालयाने आज दोषी ठरवले आहे. आज सत्र न्यायालयात सुरत येथील या बलात्कारप्रकरणी सुनावणी होती. आता ३० एप्रिल रोजी सत्र न्यायालय नारायण साईला शिक्षा सुनावणार आहे. सुरत येथे राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार केल्याचा आरोप नारायण साईवर आहे. नारायणचा सहकारी गंगा, जमुना आणि हनुमान हे देखील यामध्ये दोषी ठरवण्यात आले आहेत.
या प्रकरणी बलात्कार, लैंगिक शोषण, अनैतिक संबंध बनवणे आणि इतर आरोप प्रकरण सुरत पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली होती. ऑक्टोबर 2013 मध्ये सूरत पोलिसांनी ही तक्रार दाखल करुन घेतली. यामधील एक तक्रार ही आसाराम तर दुसरी तक्रार ही नारायण साई याच्याविरूद्ध होती. दोन बहीणींपैकी लहान बहिणीने नारायण साईवर आरोप केला होता. 2002 ते 2005 पर्यंत आपले सलग लैंगिक शोषण केल्याचा आरोप नारायणवर होता. यावेळी पीडित सूरत येथील आश्रमात राहत होती.
Gujarat: Narayan Sai, son of Asaram found guilty in a rape case, by Surat Sessions Court. Sentence to be pronounced on April 30 (file pic) pic.twitter.com/zKLosJBOoG
— ANI (@ANI) April 26, 2019
गुजरात : आसाराम बापूचा मुलगा नारायण साई बलात्काराच्या प्रकरणात दोषी, सुरत सत्र न्यायालयाचा निर्णय, 30 एप्रिल रोजी शिक्षेची सुनावणी #narayansai
— Lokmat (@MiLOKMAT) April 26, 2019