रोहा कोलाड रोडवर लाखोंचे अंमली पदार्थ जप्त; 2 आरोपींना अटक, एक फरार
By निखिल म्हात्रे | Published: September 12, 2023 08:37 PM2023-09-12T20:37:19+5:302023-09-12T20:37:38+5:30
आरोपींना ताब्यात घेतले असून एक फरार झाला आहे.
अलिबाग - रायगड जिल्हयातील रोहा कोलाड रस्त्यावर असणाऱ्या मराठा पॅलेस हॉटेल जवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगडच्या पथकाने अंमली पदार्थ जप्त करीत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून एक फरार झाला आहे.
रोहा तालुक्यातील रोहा कोलाड रस्त्यावरील मराठा पॅलेस जवळ एक इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गोपनीय सूत्रांमार्फत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला प्राप्त झाली होती. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम,सहाय्यक फौजदार दीपक मोरे, पोलीस हवालदार विकास खैरनार पोलीस हवालदार रुपेश निगडे, पोलीस हवालदार सुदीप पहेलकर ,पोलीस शिपाई अक्षय जगताप, पोलीस शिपाई स्वामी गावंड, पोलीस शिपाईओमकार सोंडकर या पथकाने सापळा रचून कारवाई केली असता रुपये 5,34,000/-किंमतीचा चरस हा अमली पदार्थ एकूण 1068 ग्रॅम वजनाचा प्रति ग्रॅम 500/- रु प्रमाणे जप्त केले आहे.यावेळी देवेंद्र जयदास पाटील( वय -26 वर्ष ),भारत आत्माराम पालेकरवय (वय-30वर्ष ,दोन्ही रा- जिवणाबंदर श्रीवर्धन , ता-श्रीवर्धन ,जि - रायगड)याना अटक केली असून राजन पांडूरंग चेवले (रा- जिवणाबंदर श्रीवर्धन , ता-श्रीवर्धन ,जि - रायगड) हा आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.