कळंगुट येथे ८४ हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त; महाराष्ट्रातील युवकाला अटक  

By काशिराम म्हांबरे | Published: February 24, 2024 04:05 PM2024-02-24T16:05:48+5:302024-02-24T16:06:18+5:30

आज करण्यात आलेली ही कारवाई पोरबावाडो येथील बोडकेवड  जंक्शनजवळ करण्यात आली. 

Narcotics worth Rs 84 thousand seized in Calangute; Youth arrested in Maharashtra | कळंगुट येथे ८४ हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त; महाराष्ट्रातील युवकाला अटक  

कळंगुट येथे ८४ हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त; महाराष्ट्रातील युवकाला अटक  

म्हापसा: कळंगुट पोलिसांनी दोन दिवसात केलेल्या दुसऱ्या कारवाईत जांब - उस्मानाबाद, महारा FCष्ट्र येथील व्यक्तीला अंमली पदार्थासहित अटक केली आहे. आज  शनिवारी कळंगुट पोलिसांनी कल्याणनगर येथील रहिवासी असलेल्या अंकुश काळे ( वय ३५) या युवकाकडून  ८४० ग्राम वजनाचा तसेच ८४ हजार रुपये किमतीचा बेकायदेशीरपणे बाळगलेला गांजा जप्त केला आहे.

आज करण्यात आलेली ही कारवाई पोरबावाडो येथील बोडकेवड  जंक्शनजवळ करण्यात आली. संशयित या ठिकाणावर अमंली पदार्थासहित येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या महितीच्या आधारे उपनिरीक्षक राजाराम बागकर यांनी निरीक्षक  मिलींद भुईबर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करुन त्याला ताब्यात घेण्यात आले.

संशयिता विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून पुढील तपास कार्य सुरु करण्यात आले आहे. काल शुक्रवारी कळंगुट पोलिसांनी आश्रू काळे या जांब- उस्मानाबाद येथील युवकाकडून ९६० ग्राम वजनाचा तसेच ९६ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला होता.

Web Title: Narcotics worth Rs 84 thousand seized in Calangute; Youth arrested in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.