डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या; मंगळवारी आरोप निश्चिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 08:20 AM2021-09-05T08:20:26+5:302021-09-05T08:21:16+5:30
या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर यांच्यावर कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्यात आले आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील पाच आरोपींवर येत्या मंगळवारी आरोप निश्चित करण्यात येणार आहेत. त्यासाठी आरोपींना प्रत्यक्ष किंवा ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे उपस्थित राहण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत. विशेष न्यायाधीश
एस. आर. नावंदर यांनी हा आदेश
दिला.
या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर यांच्यावर कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्यात आले आहेत तर, आरोपी ॲॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर पुरावे नष्ट करण्याचा आरोप आहे. यापैकी तावडे, अंदुरे आणि कळसकर कारागृहात असून, पुनाळेकर आणि भावे जामिनावर आहेत. शुक्रवारी आरोपींवर आरोप निश्चितीसाठी युक्तिवाद झाला.