भिवंडीत चैन स्नॅचिंग करणाऱ्या अट्टल चोरट्यास जेरबंद करण्यात नारपोली पोलिसांना यश
By नितीन पंडित | Published: November 10, 2022 05:59 PM2022-11-10T17:59:14+5:302022-11-10T18:00:13+5:30
भिवंडी - भिवंडी शहर व ग्रामीण भागात चैन स्नाचिंगच्या घटना वाढल्या असतानाच नारपोली पोलिसांनी एका अट्टल चोरट्यास अटक करीत ...
भिवंडी - भिवंडी शहर व ग्रामीण भागात चैन स्नाचिंगच्या घटना वाढल्या असतानाच नारपोली पोलिसांनी एका अट्टल चोरट्यास अटक करीत त्याच्या ताब्यातून १ लाख २ हजार ६०० रुपये किमतीचे दागिने जप्त केले असल्याची माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी गुरुवारी दिली आहे.
२७ ऑक्टोबर रोजी अंजुरफाटा खारबाव रस्त्यावर रिक्षातून जाणाऱ्या समिक्षा सुनिल पाटील त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याची चैन एका मोटार सायकल वरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी हिसकावून चोरी केली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना सहा. पोलीस आयुक्त किशोर खैरनार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ, पोनि (गुन्हे) संभाजी जाधव यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक अधिकारी पोउपनिरी रोहन शेलार, सहा.पोलीस उप निरीक्षक डी.डी.पाटील, सपोउपनिरी बी एस नवले,पोहवा भगवान चव्हाण,हरेश म्हात्रे,लक्ष्मण सहारे,सुनिल शिंदे, योगेश क्षिरसागर,मयुर शिरसाट,विजय ताठे यांनी मोठ्या शिताफीने बाकर उर्फ बाबर अक्रम अल्ली, वय ३९ रा.आंबिवली,कल्याण यास अटक करून त्याचेकडून गुन्हयातील जबरी चोरी केलेले ५४ हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याचे चैन हस्तगत करण्यात आली असून त्याने नारपोली पोलीस ठाण्यात दाखल दुसऱ्या गुन्ह्यातील ४८ हजार ६०० रुपये किमतीची ९ ग्रॅम वजनाची सोन्याची गंठण असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याविरोधात महाराष्ट्र तसेच इतर राज्यात ९० पेक्षा जास्त जबरी चोरीचे ,चैन स्नॅचींगचे गुन्हे दाखल असल्याची माहिती नारपोली पोलिसांनी दिली आहे.