नाशिकमध्ये बोटींपाठोपाठ हातगाड्या जाळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 11:45 AM2021-03-26T11:45:50+5:302021-03-26T11:45:57+5:30
आज सकाळी हा प्रकार उघड झाला. गाडगे महाराज पुलाजवळ असलेल्या खंडेराव महाराज मंदिरासमोर तीन चायनीज पदार्थ विकणाऱ्या हातगाड्यांवर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून जाळल्या आहेत.
नाशिक : गंगाघाटावरील गांधी तलावात उभ्या केलेल्या बोटी जाळल्याचे प्रकरण ताजे असतांनाच शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी पुन्हा धुडगूस घालत गोदकाठी काही हातगाड्या पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे.
आज सकाळी हा प्रकार उघड झाला. गाडगे महाराज पुलाजवळ असलेल्या खंडेराव महाराज मंदिरासमोर तीन चायनीज पदार्थ विकणाऱ्या हातगाड्यांवर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून जाळल्या आहेत.
नाशिक मध्ये गुन्हेगारी टोळ्या पुन्हा डोके वर काढत आहेत. वाहन किंवा तत्सम साहित्य पेटवून देण्याचा आणि दहशत निर्माण करण्याचे प्रकार या पूर्वीही उघड झाले आहेत. आता हे प्रकार पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी संबंधितांना पकडून जरब बसवावी अशी मागणी होत आहे.