नाशिक पुन्हा हादरले; पंधरवड्यात सातवा खून; हल्लेखोराला महिला पोलिसाने पाठलाग करत पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 03:26 PM2022-06-01T15:26:14+5:302022-06-01T15:37:32+5:30

Crime News : येथून पोलीस ठाण्यात कर्तव्यावर जात असलेल्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबल यांनी प्रसंगावधान दाखवत दुचाकी थांबवून संशयित हल्लेखोराला घटनास्थळापासून काही मीटर अंतरावर पाठलाग करून पकडले.

Nashik trembled again; Seventh murder in fortnight; The assailant was chased and caught by female police | नाशिक पुन्हा हादरले; पंधरवड्यात सातवा खून; हल्लेखोराला महिला पोलिसाने पाठलाग करत पकडले

नाशिक पुन्हा हादरले; पंधरवड्यात सातवा खून; हल्लेखोराला महिला पोलिसाने पाठलाग करत पकडले

googlenewsNext

नाशिक : चौघा चोरांच्या टोळक्यामध्ये चोरीचा माल वाटप करण्यावरून वाद सुरू झाले. यावेळी दोघे घटनास्थळावरून निघून गेले; मात्र दोघांमध्ये हा वाद चांगलाच वाढला आणि एकाने त्याच्या दुसऱ्या साथीदाराच्या डोक्यात दगड टाकून व चाकूने वार करून भर रस्त्यात पवन नथू पगारे (२२,रा.सोयगाव, मालेगाव) याला ठार मारले. बुधवारी (दि.१) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गंगापुर पोलीस ठाणे हद्दीतील ध्रूवनगरकडे जाणाऱ्या कॅनॉलरोडवर ही घटना घडली. येथून पोलीस ठाण्यात कर्तव्यावर जात असलेल्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबल यांनी प्रसंगावधान दाखवत दुचाकी थांबवून संशयित हल्लेखोराला घटनास्थळापासून काही मीटर अंतरावर पाठलाग करून पकडले.

भुरट्या चोऱ्या करणारा पवन नथू पगार व त्याचा साथीदार अतुल अजय सिंग (२१,रा.सातपुर कॉलनी) हे एका दुचाकीने कॅनॉलरोडवरून फिरत होते. त्यांच्यासोबत अन्य दोघे साथीदारदेखील होते. रस्त्यालगत थांबून चोरीचा माल वाटप करण्यावरून चौघांमध्ये शाब्दीक वाद सुरू झाला. यावेळी दोघे दुचाकीने तेथून निसटले; मात्र पवन व अतुल हे त्याच ठिकाणी उभे होते. यावेळी दोघांमध्ये शिवीगाळ सुरू झाल्याने संशयित अतुल याने पवनच्या डोक्यात दगड घालून व चॉपरने वार करुन खून केला. यावेळी हाणामारी झाल्याने आजुबाजुले लोक तसेच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ठिकाणांचे मजूर धावले.

आरडाओरड झाल्याने जवळच असलेले गंगापुर पोलिसांचे गुन्हे शोध पथकाचे वाहन वेगाने माघारी फिरले आणि घटनास्थळी त्वरित पोहचले. यावेळी हातात मोठा चाकू घेऊन पळणाऱ्या संशयित अतुल यास महिला पोलीस सरला खैरनार यांनी दुचाकीवरून उतरून पाठलाग करत पकडले. पोलिसांनी त्यास बेड्या ठोकून वाहनात डांबले. पवन हा रक्ताच्या थारोळ्यात कोसळून जागीत मृत्युमुखी पडला होता. घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला पथकाने कळविली. घटनास्थळी गंगापुर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रियाज शेख हे पथकासह पोहचले. तसेच काही वेळेत पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरेदेखील घटनास्थळी दाखल झाले. पोलीस, फॉरेन्सिक विभाग यांनी घटनास्थळी पंचमाना करत पुराव्यांचे संकलन केले. संशयित अतुल व मयत पवार यांनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने सातपूर पोलिसांच्या हद्दीत रात्री भुरट्या चोऱ्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

 

Web Title: Nashik trembled again; Seventh murder in fortnight; The assailant was chased and caught by female police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.