नाशिक हादरलं! भरदिवसा उद्योजकाची कंपनीच्या गेटवर तलवारीने सपासप वार करून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 01:23 PM2022-06-07T13:23:13+5:302022-06-07T13:33:21+5:30

Murder Case : गेल्या पंचवीस दिवसांमध्ये नाशकात झालेली खूनाची ही आठवी घटना आहे. यामुळे नाशिक शहर पुन्हा एकदा हादरले.

Nashik trembled! During the day, the businessman was stabbed to death at the gate of the company | नाशिक हादरलं! भरदिवसा उद्योजकाची कंपनीच्या गेटवर तलवारीने सपासप वार करून केली हत्या

नाशिक हादरलं! भरदिवसा उद्योजकाची कंपनीच्या गेटवर तलवारीने सपासप वार करून केली हत्या

googlenewsNext

नाशिक : नाशिक शहर व परिसरामध्ये मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू झालेली खुनाची मालिका अद्यापही संपता संपत नसल्याने नाशिककरांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आज मंगळवारी (दि.7) सकाळी 11 वाजेच्या सुमारास येथील अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये एका उद्योजकाला हल्लेखोरांनी तलवारीने भोसकून प्रवेशद्वारावर ठार केल्याची घटना घडली. गेल्या पंचवीस दिवसांमध्ये नाशकात झालेली खूनाची ही आठवी घटना आहे. यामुळे नाशिक शहर पुन्हा एकदा हादरले.


अंबड औद्योगिक वसाहतीमधील गरवारे पॉईंट जवळील सीमेन्स कंपनीसमोर असलेल्या एका लहान इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीत नेहमीप्रमाणे नंदकुमार आहेर(५२,रा.महात्मानगर) हे कारने आले. प्रवेशद्वारावर कारमधून ते उतरले असता दुचाकीने आलेल्या तिघांनी तलवार व अन्य धारधार हत्याराने त्यांच्यावर हल्ला चढवून गंभीर जखमी केले. धावपळ व आवाज झाल्याने कंपनी कामगार, सुरक्षारक्षक बाहेर धावले असता आहेर  रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्वरित कामगारांनी रुग्णवाहिका बोलावून घेत जवळच्या रुग्णालयात त्यांना दाखल केले. तेथून पुन्हा एका मोठ्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले यावेळी डॉक्टरांनी त्यांना उपचारादरम्यान मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे आधिकरी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त दर्जाचे आधिकारीही घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली एक मोठी गंजलेली तलवार आढळून आली आहे. हल्लेखोर हे साधारणपणेवीस वर्षाच्या आतील असण्याची श्यक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

हल्ला करणाऱ्या तिघांचा शोध सुरू आहे. अंबड पोलिसांसह गुन्हे शाखा व आयुक्तालयाचे पथक, फॉरेन्सिक पथक, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात शोध घेतला जात आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून नाशकात खुनसत्र सुरू झाले असून या महिन्यात सहा आणि जूनमध्ये दोन खून झाल्याने नाशिककर हादरून गेले आहे. दरम्यान, मयत आहेर हे राज्य मंत्रीमंडळातील एका सदस्यांचे जवळचे नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे. मयत आहेर यांच्या काकांची कंपनी असून तेच सर्व व्यावसायिक कामकाज बघत होते.  पोलिस अधिक बारकाईने खूनाच्या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Web Title: Nashik trembled! During the day, the businessman was stabbed to death at the gate of the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.