नाशकात युवकाला धारधार शस्त्राने भोसकले; लागोपाठ दुसरा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 11:47 PM2021-08-31T23:47:35+5:302021-08-31T23:48:02+5:30

सिडकोतील स्टेट बँक चौपाटीजवळ असलेल्या सोनाली मटन खानावळीसमोर गेल्या बुधवारी २८ जुलै रोजी रात्री एका तरुणाचा खून केल्याचा प्रकार ताजा असताना मंगळवारी पुन्हा असाच प्रकार घडला आहे.

In Nashik, a youth was stabbed with a sharp weapon; The second murder in a city | नाशकात युवकाला धारधार शस्त्राने भोसकले; लागोपाठ दुसरा खून

नाशकात युवकाला धारधार शस्त्राने भोसकले; लागोपाठ दुसरा खून

googlenewsNext

नाशिक : येथील लेखानगर चौपाटीजवळ एका तरुणाचा खून झाल्याच्या घटनेला महिना  उलटत नाही, तोच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारगिल चौक भागात मंगळवारी (दि.३१) रात्री जुन्या भांडणाची कुरापत काढून एका तरुणास धारदार शस्त्राने भाेसकून खून करण्यात आल्याच्या घटनेने परिसर हादरला. अंबड पोलीस ठाण्याचे सूत्रे जुन्याच अधिकाऱ्यांकडे बदलीनंतर कायम ठेवण्यात आल्याने पोलीस हद्दीतील गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

सिडकोतील स्टेट बँक चौपाटीजवळ असलेल्या सोनाली मटन खानावळीसमोर गेल्या बुधवारी २८ जुलै रोजी रात्री एका तरुणाचा खून केल्याचा प्रकार ताजा असताना मंगळवारी पुन्हा असाच प्रकार घडला आहे. अंबड पोलीस ठाणे हद्दीत महिनाभरात दोन खून झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी नऊ वाजेच्या सुमारास राहुल गवळी (२५) या तरुणास अंबड येथील कारगिल चौक परिसरात जुन्या भांडणाची कुरापत काढून संशयितांच्या टोळक्याने बेदम मारहाण करून प्राणघातक हल्ला करत धारदार शस्त्राने भोसकले. यात राहुल हा गंभीर जखमी झाल्याने या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हल्लेखोर नेमके कोण होते? याबाबत उशिरापर्यंत पोलिसांना सुगावा लागलेला नव्हता. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: In Nashik, a youth was stabbed with a sharp weapon; The second murder in a city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस