पतीच्या घरातून प्रियकरासह दागिने, रोख चोरून पळलेल्या पत्नीवर नवघर पोलिसांनी दाखल केला गुन्हा

By धीरज परब | Published: January 7, 2024 05:46 PM2024-01-07T17:46:32+5:302024-01-07T17:46:57+5:30

मीरारोड - पत्नी प्रियकरासह घरातील ३० लाख ९० हजारांची रोख व दागिने घेऊन पळून गेल्या प्रकरणाच्या पतीच्या तक्रारींवर गेले ...

Navghar police registered a case against the wife who stole jewelery and cash from her husband's house along with her lover | पतीच्या घरातून प्रियकरासह दागिने, रोख चोरून पळलेल्या पत्नीवर नवघर पोलिसांनी दाखल केला गुन्हा

पतीच्या घरातून प्रियकरासह दागिने, रोख चोरून पळलेल्या पत्नीवर नवघर पोलिसांनी दाखल केला गुन्हा

मीरारोड - पत्नी प्रियकरासह घरातील ३० लाख ९० हजारांची रोख व दागिने घेऊन पळून गेल्या प्रकरणाच्या पतीच्या तक्रारींवर गेले काही महिने गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या नवघर पोलिसांनी उशिराने का होईना अखेर गुन्हा दाखल केला आहे. मात्र प्रियकराने अग्नीशस्त्रे दाखवून धमकावल्या प्रकरणी कलम पोलिसांनी लावली नसल्याचे फिर्यादी पतीने म्हटले आहे. 

मीरारोडच्या न्यू गोल्डन नेस्ट, मिठालाल जैन बंगल्या समोर जानकी हाईट्स गणेश हंडगर ( ४८ ) हे ९४ वर्षांची आई ताराबाई, ५ वर्षांचा मुलगा गुरुत्व तसेच ३६ वर्षीय पत्नी बेबी उर्फ मुस्कान यांच्या सोबत राहतात. परंतु पत्नी मुस्कान हिचे सलमान खान नावाच्या व्यक्ती सोबत घरातच आक्षेपार्ह्य स्थितीत गणेश यांनी पकडल्याने त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. जुलै २०२२ मध्ये मुस्कान ही सलमान सोबत घरातील बरेच सामान तसेच ३० लाख ९० हजार रुपयांचे दागिने व रोख चोरून पळून गेली.

गणेश यांनी नवघर पोलिसांना सातत्याने अनेक पुराव्यांसह तक्रारी अर्ज केले. सलमान ह्याने तर कोणत्या पोलिसा सोबत बोलणे करून देऊ असे सांगत ८ - १० पोलीस तुझ्या घरी पाठवू का? सांगत अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे घेऊन गणेश यांना अग्निशस्त्र दाखवून मारून टाकण्याची धमकी दिली. गणेश यांच्या फिर्यादी नंतर ५ जानेवारी रोजी नवघर पोलिसांनी मुस्कान व सलमान वर गुन्हा दाखल केला आहे. 

लेखी तक्रारी व पुरावे देऊन सुद्धा नवघर पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते उलट गणेश यांनी दिलेले पुरावे आरोपीना कळायचे. पोलिसांकडे सातत्याने जाऊन त्यांना वस्तुस्थिती सांगितली. आपले जबाब सुद्धा घेण्यात आले . पोलीस एकीकडे आरोपीना पाठीशी घालत असताना आपल्यावर मात्र आरोपींच्या सांगण्या वरून खोटा गुन्हा लगेच दाखल केला. अखेर आपल्याला मुंबई उच्च न्यायालयात नवघर पोलिसांच्या अन्याया विरोधात न्याय मिळवण्यासाठी याचिका दाखल करावी लागली असे गणेश यांनी सांगितले. 

Web Title: Navghar police registered a case against the wife who stole jewelery and cash from her husband's house along with her lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.