बापरे! 300 रुपयांच्या लिपस्टिकच्या नादात डॉक्टरने गमावले 1 लाख; एक मेसेज आला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 09:47 AM2023-11-20T09:47:44+5:302023-11-20T09:53:42+5:30

ई-कॉमर्स पोर्टलवरून 300 रुपयांची लिपस्टिक ऑर्डर केल्यानंतर 1 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.

navi mumbai online fraud woman doctor in case of lipstick order upi fraud | बापरे! 300 रुपयांच्या लिपस्टिकच्या नादात डॉक्टरने गमावले 1 लाख; एक मेसेज आला अन्...

बापरे! 300 रुपयांच्या लिपस्टिकच्या नादात डॉक्टरने गमावले 1 लाख; एक मेसेज आला अन्...

ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्कॅमर्स फसवणूक करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करत आहेत. नवी मुंबईतही अशीच एक फसवणुकीची घटना समोर आली आहे. एका महिला डॉक्टरला लाखोंचा फटका बसला आहे. ई-कॉमर्स पोर्टलवरून 300 रुपयांची लिपस्टिक ऑर्डर केल्यानंतर 1 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. लिपस्टिकची ऑर्डर दिल्यानंतर काही दिवसांनी कुरिअर कंपनीकडून एक मेसेज आला की तिची ऑर्डर डिलिव्हर झाली आहे. 

ऑर्डर न मिळाल्याने डॉक्टरने कंपनीच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधला. याच दरम्यान महिला डॉक्टरांना सांगण्यात आलं की, ग्राहक सेवा प्रतिनिधी लवकरच तिच्याशी संपर्क साधेल. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, जेव्हा महिलेला ग्राहक सेवा प्रतिनिधीकडून कॉल आला तेव्हा तिला सांगण्यात आलं की तिची ऑर्डर होल्डवर ठेवण्यात आली आहे आणि ती घेण्यासाठी तिला 2 रुपये ट्रान्सफर करावे लागतील. 

डॉक्टरने पैसे पाठविण्यास नकार दिला. कॉलरने तिला अनेक विनंत्या केल्या आणि पैसे ट्रान्सफर करावे लागतील असं सांगितलं, पण ती यासाठी तयार झाली नाही. त्यानंतर तिला एक वेब लिंक पाठवून ती डाउनलोड करण्यास सांगितलं. लवकरात लवकर तिला त्याचा पत्ता आणि बँक तपशील भरण्यास सांगण्यात आलं.

डॉक्टरांना BHIM UPI लिंक बाबत एक मेसेज आला, मात्र तिने लगेच फोन करणाऱ्याला त्याबद्दल विचारलं. कॉलरने तिला आश्वासन दिलं की आता पार्सल वितरित केलं जाईल. मात्र, 9 नोव्हेंबर रोजी तिच्या बँक खात्यातून 95,000 आणि 5,000 रुपये डेबिट झाले. खात्यातून पैसे डेबिट झाल्याचा मेसेज डॉक्टरला मिळताच तिने नेरुळ येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: navi mumbai online fraud woman doctor in case of lipstick order upi fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.