नवी मुंबई पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण घसरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 14:26 IST2019-01-30T14:25:45+5:302019-01-30T14:26:11+5:30
वर्षभरातील 5515 गुन्हेपैकी 3636 गुन्हे उघड

नवी मुंबई पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण घसरले
नवी मुंबई - गतवर्षात नवी मुंबई आयुक्तालयात 5515 गुन्हे घडले आहेत. त्यापैकी 3636 गुन्हे उघकीस आले आहेत. गुन्हे प्रकटीकरणाचे हे प्रमाण 66 टक्के इतके आहे. मात्र 2017 मध्ये गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण 72 टक्के होते. त्यात गतवर्षी 6 टक्केनी घट झाली आहे. तर 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये शहरातील गुन्ह्यात 14.33 % ने वाढ झाली असल्याची माहिती पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिली.