Navjot Singh Sidhu road rage case: सिद्धूची ३४ वर्षे जुनी फाईल पुन्हा उघडणार? रोड रेज हत्या प्रकरणी मृताचे नातेवाईक सर्वोच्च न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 09:16 AM2022-05-19T09:16:54+5:302022-05-19T09:17:34+5:30

३४ वर्षे जुन्या रोडरेज केसमध्ये सर्वोच्च न्यायालय २० मे रोजी निर्णय देणार आहे. याचिकेवर निर्णय देताना सिद्धूंची शिक्षा वाढवायची की नाही यावर विचार केला जाणार आहे.

Navjot Singh Sidhu road rage case: Will Sidhu's 34 year old file be reopened? Relatives of the deceased in the road rage murder case in the Supreme Court | Navjot Singh Sidhu road rage case: सिद्धूची ३४ वर्षे जुनी फाईल पुन्हा उघडणार? रोड रेज हत्या प्रकरणी मृताचे नातेवाईक सर्वोच्च न्यायालयात

Navjot Singh Sidhu road rage case: सिद्धूची ३४ वर्षे जुनी फाईल पुन्हा उघडणार? रोड रेज हत्या प्रकरणी मृताचे नातेवाईक सर्वोच्च न्यायालयात

googlenewsNext

काँग्रेसचे पंजाबमधील नेते आणि भारतीय क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ३४ वर्षांपूर्वी सिद्धू आणि त्यांच्या एका मित्राने केलेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सिद्धू यांची शिक्षा वाढवावी यासाठी त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. महत्वाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूची शिक्षा कमी करून १००० रुपयांच्या दंडावर मुक्तता केली होती. 

३४ वर्षे जुन्या रोडरेज केसमध्ये सर्वोच्च न्यायालय २० मे रोजी निर्णय देणार आहे. याचिकेवर निर्णय देताना सिद्धूंची शिक्षा वाढवायची की नाही यावर विचार केला जाणार आहे. पंजाब हरियाना उच्च न्यायालयाने सिद्धूला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात तीन वर्षांचा तुरुंगवास ठोठावला होता. तर सर्वोच्च न्यायालयाने सिद्दूला या आरोपांतून मुक्त केले होते, तसेच मारहाण प्रकरणी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. 

२७ डिसेंबर १९८८ मध्ये ही घटना घडली होती. सिद्धूने पटियालामध्ये रस्त्याच्या मधोमध जिप्सी पार्क केली होती. या मार्गावरून मृत ६५ वर्षीय व्य़क्ती आणि अन्य दोघे बँकेत पैसे काढण्यासाठी जात होते. यावेळी त्यांनी सिद्धूला गाडी बाजुला घेण्यास सांगितले. यातून वाद झाला आणि सिद्धू आणि त्याच्या सहकाऱ्याने मारहाण केली. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोप केला होता की, सिद्धू हे मारहाण करून पसार झाले होते. 

सप्टेंबर १९९९ मध्ये कनिष्ठ कोर्टाने नवजोत सिंग सिद्धूला निर्दोष सोडले होते. परंतू उच्च न्यायालयाने डिसेंबर २००६ मध्ये सिद्धूला आणि अन्य एकाला दोषी ठरवत तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यावर सिद्धूने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मृताच्या नातेवाईकांनी रिव्हू पिटीशन दाखल केली आहे. मृत गुरनाम सिंगच्या नातेवाईकांनी सिद्धू यांच्या एका शो मधील गुरनामला मारल्याच्या वक्तव्याची क्लिप न्यायालयात सादर केली आहे. 

Web Title: Navjot Singh Sidhu road rage case: Will Sidhu's 34 year old file be reopened? Relatives of the deceased in the road rage murder case in the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.