शेअर बाजाराच्या देण्यांतून नौसैनिकाला जाळल्याचे उघड 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 04:43 AM2021-02-08T04:43:49+5:302021-02-08T04:44:06+5:30

पोलीस तपासांत अनेक बाबी स्पष्ट; पोलीस अधीक्षकांची माहिती

Navy sailor abducted burnt alive for Rs 10 lakh ransom in Palghar | शेअर बाजाराच्या देण्यांतून नौसैनिकाला जाळल्याचे उघड 

शेअर बाजाराच्या देण्यांतून नौसैनिकाला जाळल्याचे उघड 

googlenewsNext

पालघर : तलासरी वेवजी गावाच्या जंगलात सूरजकुमार दुबे या रांची येथील २७ वर्षीय नौदल सैनिकाचे अपहरण करून खून केल्याचे प्रकरण गाजले होते. हा खून शेअर बाजारात गुंतविण्यात आलेल्या पैशांच्या देवाणघेवाणीतून झाल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी तपासासाठी १०० पोलिसांची १० पथके बनविण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

झारखंड राज्यातील रांची येथील डाल्टनगंज येथील रहिवासी असलेले सूरजकुमार दुबे हे भारतीय नौदलात २००१ पासून रुजू झाले होते. ३१ जानेवारी रोजी त्यांचे चेन्नई विमानतळावरून अपहरण करून तीन दिवस चेन्नईत एका अज्ञात ठिकाणी कोंडून ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना ५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र-गुजरात सीमेजवळील वेवजी गावाच्या जंगलात झाडाला बांधून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. या घटनेनंतर त्यांच्यावर उपचार चालू असताना त्यांना मृत्यूने गाठले होते. या प्रकरणात अपहरणासह खुनाचा प्रयत्न या कलमान्वये अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्यांचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी कलम ३२० अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तपासाअंती समोर आलेले काही वेगळे मुद्दे पत्रकारांसमोर मांडले. सूरजकुमार यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबानीत १० लाख रुपयांसाठी आपले अपहरण करून जाळल्याची माहिती दिली होती. सूरज यांच्याजवळ दोन मोबाईल नंबर असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे असले तरी त्यांच्याजवळ एकूण तीन मोबाईल नंबर असल्याची माहिती समोर आली आहे.

मित्रांकडून घेतले होते कर्ज 
घरी माहीत नसलेल्या अन्य दुसऱ्या मोबाईल नंबरवरून सूरज याने शेअर मार्केटशी व्यवहार केल्याची बाब समोर आली आहे. त्याला शेअर आणि स्टाॅक मार्केटमध्ये गुंतवणुकीचे वेड होते. त्याच्या बँक खात्यातून अनेक व्यवहार झाल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. 
या शेअर मार्केटच्या वेडापायी त्याने लाखो रुपयांचे कर्ज बँकेकडून, मित्रांकडून, अन्य लोकांकडून घेतल्याची बाबही समोर आली आहे.

Web Title: Navy sailor abducted burnt alive for Rs 10 lakh ransom in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.