Nawab Malik : नवाब मलिकांची जामिनासाठी पुन्हा विशेष कोर्टात धाव, नव्याने अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 05:11 PM2022-07-06T17:11:27+5:302022-07-06T17:12:00+5:30
Nawab Malik bail Application : याबाबत ईडी कोणतेही पुरावे सादर करू शकले नसल्याचे मलिक यांचे म्हणणं आहे.
मुंबई : मनी लॉन्ड्रिंग आणि दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तीयांकडून संपत्ती खरेदी करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी विशेष न्यायालयात जामिनासाठीही नव्याने अर्ज दाखल केला आहे. दाऊदशी संबंध असल्याचे आरोप अर्जात फेटाळण्यात आले आहेत. याबाबत ईडी कोणतेही पुरावे सादर करू शकले नसल्याचे मलिक यांचे म्हणणं आहे.
नवाब मलिक यांना एप्रिल महिन्यात सुप्रीम कोर्टाचा दणका दिला. मलिक यांनी अंतरिम जामीनासाठी कोर्टात अर्ज केला होता. परंतु कोर्टानं सध्या तपास सुरू असल्याने हस्तक्षेप करणं योग्य नाही असं सांगत अर्ज फेटाळून लावला होता. उच्च न्यायालयाने नवाब मलिकांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. परंतु याठिकाणीही मलिक यांना दिलासा मिळाला नव्हता. नवाब मलिक यांच्यावर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यापासून नवाब मलिक ईडीच्या कोठडीत आहेत. जामीन अर्जावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की, तपासाच्या या टप्प्यावर आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही.