नवाब मलिक यांची जेलमध्ये रवानगी होणार, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 01:42 PM2022-03-07T13:42:46+5:302022-03-07T13:43:36+5:30
Nawab malik Remanded in Judicial Custody : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना तब्बल साडेसात तासांच्या चौकशीअंती २३ फेब्रुवारीला अटक केली होती.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक(Nawab Malik) यांच्या प्रकरणी आज कोर्टात पुन्हा सुनावणी झाली. नवाब मलिक यांना ७ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती आणि ती आज संपली असून सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना तब्बल साडेसात तासांच्या चौकशीअंती २३ फेब्रुवारीला अटक केली. आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने २१ मार्चपर्यंत जेलमध्ये राहावे लागणार आहे.
Maharashtra minister Nawab Malik remanded to 14-day judicial custody in money laundering case
— Press Trust of India (@PTI_News) March 7, 2022