लॉकडाऊनदरम्यान गडचिरोलीत नक्षल चकमकीत एक जवान जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 10:07 PM2020-04-01T22:07:07+5:302020-04-01T22:09:28+5:30
प्रकृती स्थिर : नागपुरात उपचार सुरू
धानोरा (गडचिरोली) : धानोरा तालुक्याच्या कारवाफा पोलीस मदत केंद्राअंतर्गत रेखाटोला जंगल परिसरात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत केद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) जवान जखमी झाला.
मंगळवारी मध्यरात्री 12 ते 1 वाजताच्या सुमारास सीआरपीएफ 192 बटालियनच्या जवानांची टीम व नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला. त्याला उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. एम.रवी असे जखमी जवानाचे नाव आहे. गोपनीय माहितीच्या आधारावर सीआरपीएफ 192 बटालियनची एक तुकडी रेखाटोला जंगल परिसरात नक्षल विरोधीअभियान राबवित असताना सदर तुकडीवर नक्षल्यांनी गोळीबार केला. सीआरपीएफ जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले.