एनसीबीची कारवाई! तीन दिवसात ६ आरोपींना अटक, अमली पदार्थ जप्त
By पूनम अपराज | Published: November 26, 2020 07:30 PM2020-11-26T19:30:27+5:302020-11-26T19:42:36+5:30
Drug Case ; सोमवारी एनसीबीने एलएसडीचे 20 ब्लॉटस व 95 ग्रँम गांजा जप्त केला आणि आरोपी केल्विन मेंडेस्वासला अटक केली.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) तीन दिवसांत मुंबई शहर आणि उपनगरात धडक कारवाई करत अमली पदार्थ विक्रीचे रँकेट उध्द्वस्त करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली.
सोमवारी एनसीबीने एलएसडीचे 20 ब्लॉटस व 95 ग्रँम गांजा जप्त केला आणि आरोपी केल्विन मेंडेस्वासला अटक केली. या प्रकरणी केलेल्या तपासाद्वारे नील डिसिल्व्हा व अहमद शेख या दोन आरोपींना बुधवारी अटक करण्यात आली. बुधवारी एनसीबीने सुनील गवई या आरोपीकडून 1.250 किलो गांजा जप्त करण्यात आला. वांद्रे न्यायालयाजवळील नाक्यावर बुधवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.
याशिवाय, एनसीबीने मुंबई सेंट्रल येथील नाथानी हाईटस या इमारतीजवळ कारवाई करुन 10 ब्लॉटस एलएसडी व 32.9 ग्रँम मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले. या प्रकरणी नवाब शेख व फारुक चौधरी या दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली.