Aryan Khan Drug Case: रेव पार्टीत जाऊ नाही शकला, पण तरीही NCBच्या जाळ्यात फसला; आर्यनच्या मित्राला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 07:04 PM2021-10-04T19:04:01+5:302021-10-04T19:11:17+5:30

Aryan Khan Drug Case: एनसीबीकडून आतापर्यंत ९ जणांना अटक

ncb arrested aryan khans school friend shreyas nair in drugs case | Aryan Khan Drug Case: रेव पार्टीत जाऊ नाही शकला, पण तरीही NCBच्या जाळ्यात फसला; आर्यनच्या मित्राला बेड्या

Aryan Khan Drug Case: रेव पार्टीत जाऊ नाही शकला, पण तरीही NCBच्या जाळ्यात फसला; आर्यनच्या मित्राला बेड्या

googlenewsNext

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर धाड टाकत काल ८ जणांना अटक केली. यामध्ये प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश असल्यानं बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. एनसीबीच्या कारवाईनं अनेकांचे धाबे दणाणले आहेत. आर्यन खानला आज एनसीबीनं किल्ला कोर्टात हजर केलं. त्याला ७ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आर्यनला जामीन मिळवण्यासाठी त्याचे वकील सतीश मानेशिंदेंनी त्यांचा अनुभव पणाला लावला. मात्र जामीन मिळवण्यात ते अपयशी ठरले.

एनसीबीनं क्रूझवरून ८ जणांना अटक केली. यानंतर आता या प्रकरणात नववी अटक झाली आहे. एनसीबीनं आर्यन खानचा मित्र श्रेयस नायरला गोरेगावातून बेड्या ठोकल्या. श्रेयसकडून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांच्या चौकशीतून श्रेयसचं नाव समोर आलं. आर्यनसोबत अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. एसबीच्या वकिलांनी ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी देण्याची मागणी केली होती.

कोण आहे श्रेयस नायर?
क्रूझवर ड्रग पार्टी केल्याप्रकरणी काल एनसीबीनं आठ जणांना अटक केली. आता याच प्रकरणात श्रेयसला अटक करण्यात आली. श्रेयस हा आर्यन खान आणि अरबाज मर्चंटचा अतिशय जवळचा मित्र आहे. श्रेयसचं नाव आर्यन आणि अरबाजच्या मोबाईलमधील चॅटिंगमधून समोर आलं. एनसीबीतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस क्रूझवरील रेव पार्टीला जाणार होता. मात्र तो जाऊ शकला नाही. ते पार्टीला का जाऊ शकला नाही, यामागाचं कारण अद्याप तरी समोर आलेलं नाही.

Web Title: ncb arrested aryan khans school friend shreyas nair in drugs case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.