‘एनसीबी’ने गोव्यात पकडला सूत्रधार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 03:29 AM2020-09-02T03:29:35+5:302020-09-02T03:31:03+5:30

एनसीबीच्या मुंबईतील छाप्यातून मिळालेल्या माहितीवरून गोव्यात हणजुणे येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एफ अहमद नामक व्यक्तीला एनसीबीने अटक केली आहे.

NCB catches mastermind in Goa | ‘एनसीबी’ने गोव्यात पकडला सूत्रधार

‘एनसीबी’ने गोव्यात पकडला सूत्रधार

Next

पणजी: अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईत अंमली पदार्थ व्यापाराचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड आले आहे. एनसीबीच्या मुंबईतील छाप्यातून मिळालेल्या माहितीवरून गोव्यात हणजुणे येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एफ अहमद नामक व्यक्तीला एनसीबीने अटक केली आहे. अहमद हा बॉलीवूडमधील मोठ्या हस्तींना ड्रग्स पुरविण्याचे काम करीत असल्याचा एनसीबीला संशय आहे.
कॅनडा आणि अमेरिकेतून दिल्ली, मुंबई गोवा आणि बंगळूरपर्यंत अंमली पदार्थ पोहचविण्याचे एक नियोजनबद्द रॅकेटचएनसीबीने उघडकीस आणले आहे. या रॅकेटच्या एका एफ अहमद नामक सूत्रधाराला गोव्यात कळंगूट येथे अटक करण्यात आली आहे.
एनसीबीचे अधिकारी के. पी. एस. मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत फार मोठा अंमली पदाथार्चा साठा जप्त करण्यात आला. या अंमली पदाथार्ला बड असे म्हणतात.

Web Title: NCB catches mastermind in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.