NCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक
By पूनम अपराज | Published: September 26, 2020 06:55 PM2020-09-26T18:55:41+5:302020-09-26T18:56:16+5:30
एक दिवस अगोदर क्षितीज प्रसाद यांना एनसीबी कार्यालयात बोलावून तासन्तास चौकशी केली होती. असा आरोप आहे की क्षितिज एका ड्रग डीलरकडून ड्रग्ज घेत असे.
बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणात चौकशी आणि अटकेच्या कारवाया सातत्याने सुरू आहेत. शनिवारी मुंबईच्या एनसीबी टीमने बॉलिवूडशी संबंधित असलेल्या क्षितीज प्रसाद याला अटक केली. क्षितिज हा धर्म प्रॉडक्शनमध्ये कार्यकारी निर्माता म्हणून काम करत होता. एनसीबीने काही दिवसांपूर्वी त्याच्याकडे सतत चौकशी केली होती आणि क्षितिजला नुकतेच अटक करण्यात आली आहे. एक दिवस अगोदर क्षितीज प्रसाद यांना एनसीबी कार्यालयात बोलावून तासन्तास चौकशी केली होती. असा आरोप आहे की क्षितिज एका ड्रग डीलरकडून ड्रग्ज घेत असे.
ड्रग पेडलर्ससह फोटो समोर आले
मिळालेल्या माहितीनुसार काही छायाचित्रे उघडकीस आली असून त्यामध्ये धर्म प्रोडक्शनचे माजी कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसाद एका ड्रग पेडलरसोबत उभे असल्याचे दिसले. ड्रग्जच्या संबंधात हे छायाचित्र क्षितीज प्रसादविरुद्ध सर्वात मोठे पुरावे मानले जात आहे. अंकुश अरेना असे या ड्रग पेडलरचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीने चौकशी व पुरावे मिळाल्यानंतरच क्षितीजला अटक केली आहे. त्याला नुकतीच एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. क्षितिजच्या घरी प्रत्येक फंक्शन किंवा पार्टी हे अंकुश हा ड्रग पेडलर सामील होत असे, मग ते मुंबई असो वा दिल्ली. विशेष म्हणजे क्षितीज प्रसाद करण जोहरच्या अगदी जवळचे मानले जातो.
करण जोहर याने दिला नकार
दरम्यान, करण जोहरने क्षितिजबद्दल माहिती देण्यास नकार दिला आहे. क्षितिज एका प्रोजेक्टसाठी त्यांच्या कंपनीशी संबंधित होता, पण तो जवळचा नाही, असे त्यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. तसेच करणने सोशल मीडियावर पोस्ट केले की 2019 मध्ये झालेल्या पार्टीबद्दल त्याने आधीच चर्चा केली आहे. त्याने कोणतीही ड्रग्ज घेतली नाही किंवा ड्रग पार्टीही केली नाही. काही महिन्यांपूर्वी करण जोहरच्या घरी झालेली एक कथित ड्रग्ज पार्टी एनसीबी रडारवर आहे, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पूनम पांडे विनयभंग प्रकरण : सॅम बॉम्बे सध्या झिजवतोय पोलीस ठाण्याचे उंबरठे
Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया
एनसीबी कार्यालयासमोर न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप
बॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनची पाळंमुळं खणून काढतोय डॅशिंग मराठी अधिकारी... चला भेटूया!
धारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या
विदेशी फेसबुक फ्रेंडने फसविले, गिफ्ट पाठविण्याची केली बतावणी
दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या
दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन