एनसीबीची नांदेडात अफू अड्यावर धाड; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 08:34 PM2021-11-22T20:34:15+5:302021-11-22T20:39:58+5:30
NCB raids : रात्री उशिरापर्यंत एनसीबीची कारवाई सुरूच होती. यावेळी जवळपास २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नांदेड - एनसीबीच्या मुंबई येथील पथकाने सोमवारी नांदेड शहरात एका व्यापारी संकुलात धाड मारली. या ठिकाणाहून जवळपास १ क्विंटल अफू जप्त करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत एनसीबीची कारवाई सुरूच होती. यावेळी जवळपास २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच एनसीबीच्या पथकाने मांजरम येथे जवळपास ८ कोटी रुपयांचा गांजा पकडला होता. एनसीबीने एकाच वेळी अनेक ठिकाणी धाडीही मारल्या होत्या. विशाखापट्टणम् येथून आलेला हा गांजा जवळगावकडे जात असल्याची माहिती होती. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यातच सोमवारी माळटेकडी परिसरात शंकरराव चव्हाण चौकात असलेल्या एका व्यापारी संकुलावर एनसीबीने धाड मारली.
यावेळी जवळपास १ क्विंटल अफू जप्त करण्यात आली आहे. अफूची बाजारात ७ ते १२ हजार रुपये किलोने विक्री होते. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरूच होती. अफू विक्रीवर प्रतिबंध असून नांदेडमध्ये काही जण बनावट आणि जुन्या परवान्याच्या आधारावर अफू विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. नांदेडमधून एका जनाला ताब्यात घेण्यात आले आहे