Video : टाय, हेल्मेट, स्टेथोस्कोप, बांगड्यांमध्ये लपवून आणलेले कोटींचे ड्रग्ज NCBने केले जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 05:01 PM2021-12-14T17:01:22+5:302021-12-14T17:22:34+5:30

NCB seizes crores of drugs : अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, न्यूझीलँडला हे ड्रग्ज पाठविण्यात येणार होते. याप्रकरणी एनसीबीकडून एकूण सहा गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. 

NCB seizes crores of drugs hidden in tie, helmet, stethoscope, bangles | Video : टाय, हेल्मेट, स्टेथोस्कोप, बांगड्यांमध्ये लपवून आणलेले कोटींचे ड्रग्ज NCBने केले जप्त

Video : टाय, हेल्मेट, स्टेथोस्कोप, बांगड्यांमध्ये लपवून आणलेले कोटींचे ड्रग्ज NCBने केले जप्त

googlenewsNext

मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई सुरु आहे. एनसीबीकडून १३ कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. मुंबईत ८ ठिकाणी सर्च ऑपरेशन करण्यात आले. हार्डड्राईव्ह, स्टेथोस्कोप, सायकल हेल्मेट, बांगड्या, टायमधून या ड्रग्जची तस्करी करण्यात आली. 

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, न्यूझीलँडला हे ड्रग्ज पाठविण्यात येणार होते. याप्रकरणी एनसीबीकडून एकूण सहा गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसापासून ही कारवाई सुरु आहे. गेल्या दोन महिन्यापासून ही टोळी मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली होती. विविध कुरियर कंपनीद्वारे हे ड्रग्ज वेगवगळ्या युक्ता लढवून हार्डड्राईव्ह, स्टेथोस्कोप, सायकल हेल्मेट, बांगड्या, टायमधून पाठविण्यात येणार होते. कुरियर कंपन्या रडारवर आहेत. एक परदेशी नागरिक ताब्यात असून त्याच्याकडे अधिक तपास सुरु आहे. 

NCB मुंबईने मुंबईतील अंमली पदार्थ सप्लायर्स आणि पेडलर्सविरुद्धच्या सततच्या मोहिमेंतर्गत मुंबईच्या विविध ठिकाणी अनेक सर्च ऑपरेशन्स सुरू केले आहे आणि १० डिसेंबर ते १४ डिसेंबरपर्यंत एकूण 2.296 किलो ऍम्फेटामाइन, 3.906 किलो अफू आणि 2.525 किलो झोल्पीडेम टॅब जप्त केल्या आहेत. 


विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, NCB मुंबईच्या पथकाने १० डिसेंबर रोजी अंधेरी पश्चिमेकडील स्टेथोस्कोपमध्ये लपवून ठेवलेले 490 ग्रॅम अॅम्फेटामाइन जप्त केले. ही खेप मुंबईतील डोंगरी येथून निघाली आणि ऑस्ट्रेलियाला गेली होती. एनसीबी मुंबईने याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात एका इव्होरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. नंतर NCB मुंबईच्या पथकाने १३ डिसेंबर रोजी अंधेरी पश्चिम येथे मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये लपवून ठेवलेले 3.906 किलो अफू जप्त केले. ही खेप अंधेरी मुंबई येथून निघाली आणि माले, मालदीव येथे पोहोचणार होती. १३ डिसेंबरला अंधेरी पूर्व येथे अन्नपदार्थ आणि किराणा मालामध्ये लपवून ठेवलेला 2.525 किलो झोलपीडेम टॅब जप्त केल्या. ही खेप अंधेरी मुंबई येथून निघाली आणि अमेरिकेतील टेक्सास येथे पोहोचवली जाणार होती. नंतर अंधेरी पूर्व येथे सायकलिंग हेल्मेट आणि बांगड्यांमध्ये लपवून ठेवलेले एकूण 941 ग्रॅम (495+446) अॅम्फेटामाइन जप्त केले. ही खेप अंधेरी मुंबई येथून निघाली आणि ऑस्ट्रेलियाला जाणार होती. १३ आणि १४ डिसेंबरदरम्यान डोंगरी, मुंबई येथे एकूण 848 ग्रॅम (458+390) अॅम्फेटामाइन जप्त केले, जे नळीच्या पाईप आणि टाय बॉक्समध्ये लपवले होते. ही खेप मुंबईतील डोंगरी येथून निघाली आणि दुबई, यूएई आणि न्यूझीलंड येथे सप्लाई केली जाणार होती. १४ डिसेंबरला अंधेरी, मुंबई येथे १ टीबी हार्ड डिस्कमध्ये लपवून ठेवलेले १७ ग्रॅम अॅम्फेटामाइन जप्त केले. ही खेप मुंबईतील अंधेरी येथून निघाली आणि स्वित्झर्लंडला जाणार होती. 

 

Web Title: NCB seizes crores of drugs hidden in tie, helmet, stethoscope, bangles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.