करण जोहरच्या व्हायरल व्हिडिओची एनसीबी चौकशी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 09:38 PM2020-09-18T21:38:35+5:302020-09-18T21:39:25+5:30
या लोकांनी पार्टीत मादक पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप मनजिंदर सिंग सिरसा यांनी केला आहे. एनसीबीचे अधिकारी आता त्याच व्हिडिओची चौकशी करतील.
मुंबई - एनसीबी बॉलीवूडच्या एका व्हायरल व्हिडिओची चौकशी करणार आहे. शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी एनसीबी प्रमुखांना भेटून वर्षभरापूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओविषयी चौकशी करण्याची मागणी केली. या व्हिडिओमध्ये करण जोहर, विक्की कौशल, शाहिद कपूर, दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर आणि वरुण धवन यांच्यासह इतर कलाकार आहेत. या लोकांनी पार्टीत मादक पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप मनजिंदर सिंग सिरसा यांनी केला आहे. एनसीबीचे अधिकारी आता त्याच व्हिडिओची चौकशी करतील.
मनजिंदर सिंग सिरसा यांनीही ट्विटद्वारे तक्रारीची माहिती दिली होती. त्यांनी ट्विटरवर लिहिले- आज मी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे प्रमुख (एनसीबी) राकेश अस्थाना यांची भेट घेतली. चित्रपट निर्माते करण जोहर आणि इतरांविरूद्ध मुंबई येथे तिच्या घरी ड्रग्स पार्टी आयोजित केल्याबद्दल चौकशी आणि कारवाईची तक्रारही त्यांनी केली आहे, त्या व्हिडिओची चौकशी व्हायला पाहिजे.
सिरसा यांनी आणखी एक व्हिडीओ ट्वीट केले आहे. ज्यात लिहिले आहे की, 'या व्हिडिओमध्ये पाहिलेला प्रत्येक चेहरा लक्षात ठेवा, काही दिवसातच हे लोक नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कार्यालयाबाहेर रांगेत उभे दिसतील !! त्यांची ड्रग पार्टीजमुळे तुरुंगात जाण्याची इच्छा! '
मनजिंदर सिंग सिरसा यांनी वर्षभरापूर्वी हा व्हिडिओ ट्विट करून तक्रार दिली होती. करण जोहरच्या घरात झालेल्या या पार्टीमध्ये दिसलेल्या सिनेतारकांनी ड्रग्ज घेतल्याचा आरोप सिरसा यांनी केला आहे. यावर करण जोहर आणि विक्की कौशलही क्लीन आले आहेत. व्हायरल व्हिडिओबद्दल करण जोहर म्हणाला होता की, मी स्वत: हा व्हिडिओ बनविला आहे, मी थोडा मूर्ख आहे की, ड्रग्स सेवनानंतर मी व्हिडिओ स्वतः सोशल मीडियावर टाकतोय. त्याचवेळी विक्की कौशल म्हणाला की, करणने हा व्हिडिओ तीन वेळा बनवला होता.
I met Sh. Rakesh Asthana, Chief of @narcoticsbureau at BSF head quarter, Delhi regarding submission of complaint for investigation & action against film Producer @karanjohar & others for organizing drug party at his residence in Mumbai
— Manjinder Singh Sirsa (@mssirsa) September 15, 2020
That party video must be investigated into! pic.twitter.com/QCK2GalUQq
#Exposed#DrugAddictStars
— Manjinder Singh Sirsa (@mssirsa) September 14, 2020
याद कर लीजिये इस वीडियो में दिख रहे हर चेहरे को
कुछ ही दिनों में ये लोग नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो के दफ़्तर के बाहर लाइन में खड़े नज़र आएंगे!! अपनी ड्रग पार्टियों के कारण जेल जाने की तैयारी में!#UdtaBollywoodpic.twitter.com/vAPH0zASOu
अन्य महत्वाच्या बातम्या...
बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा
युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच
Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा
करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार